IND vs PAK: डोळे वटारून पाहणाऱ्या पाकिस्तानी बॉलरची मैदानातच जिरवली; अंपायरला करावी लागली मध्यस्थी, पाहा VIDEO
Times Now Marathi October 20, 2024 04:45 PM

Abhishek Sharma fight with Sufiyan Muqeem: इमर्जिंग एशिया कपमध्ये यांच्यात शनिवारी (19 ऑक्टोबर 2024) मॅच रंगली. या मॅचमध्ये भारतीय टीमने पाकिस्तानच्या टीमला पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे. याच मॅच दरम्यान भारतीय बॅट्समन अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानचा बॉलर सुफियान यांच्यात वाद झाला. दोघेही एकमेकांसोबत भिडले. दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीचा होत आहे.

भारत ए टीमचा ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा याने इमर्जिंग एशिया कपमध्ये पाकिस्तान ए टीम विरुद्ध खेळताना तुफानी खेळी खेळली. अभिषेक शर्माने 22 बॉल्समध्ये 5 फोर आणि 2 सिक्सरच्या मदतीने 35 रन्स केल्या. मात्र, पाकिस्तानचा बॉलर सुफियान मुकीन याने अभिषेक शर्माला आऊट केले. आऊट झाल्यावर अभिषेक शर्मा पव्हेलियनच्या दिशेने जाण्यासाठी निघाला तितक्यात पाकिस्तानी बॉलर सुफियान याने अभिषेकला शांत राहण्याचं सांगत मैदान सोडण्याचा इशारा केला. यानंतर अभिषेक शर्माही थांबला आणि सुफियानला प्रत्युत्तर देताना दिसला.



दोघांमध्ये सुरू असलेला वाद पाहता अखेर अंपायरला मध्यस्थी करावी लागली. अंपायरने हस्तक्षेप करत अभिषेकला शांत राहण्याचा सल्ला दिला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.


आऊट होण्यापूर्वी अभिषेकची फटकेबाजी
मॅच दरम्यान अभिषेक शर्मा याने पाकिस्तानचा फास्ट बॉलर अब्बास आफ्रिदी याची चांगलीच धुलाई केली. मॅचमधील सहावी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या अब्बास याच्या पहिल्या पाच बॉल्सवर अभिषेकने दोन सिक्सर, दोन फोर आणि एक सिंगल असे एकूण 21 रन्स केले. यानंतर प्रभासिमरन सिंग याने शेवटच्या बॉलवर फोर मारला. अशा प्रकारे अब्बास आफ्रिदीने या ओव्हरसमध्ये एकूण 25 रन्स दिले. अभिषेक शर्माच्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानी बॉलर्स चांगलेच हैराण झाले होते.

टीम इंडियाने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ
इमर्जिंग एशिया कपमध्ये भारत ए विरुद्ध पाकिस्तान ए मॅच रंगली. या मॅचमध्ये भारतीय टीमने पाकिस्तानला पराभवची धूळ चारली आहे. मस्कत येथे खेळल्या जात असलेल्या टुर्नामेंटमध्ये भारताच्या टीमने 8 विकेट्स गमावत 183 रन्क केल्या. यानंतर हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमावत 176 रन्सपर्यंत मजल मारता आली. अशा प्रकारे भारताने ही मॅच 7 रन्सने जिंकली.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.