Nashik Crime : अवैध सावकाराच्या छळाला कंटाळून चहावाल्याने उचलले टोकाचे पाऊल; वैभव देवरेसह तिघांविरोधात गुन्हा
esakal October 21, 2024 12:45 PM

नाशिक : अवैध सावकाराच्या छळाला कंटाळून चहा व्यावसायिकाने आत्महत्त्या केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार व अवैध सावकार वैभव देवरे याच्यासह त्याची पत्नी व शालकाविरोधात गंगापूर पोलिसात अवैध सावकारी व आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती शाखेने देवरेची पत्नी व शालकाला अटक केली असून, पसार झालेल्या वैभव देवरेचा पोलीस शोध घेत आहेत. (against Vaibhav Deore and three others after tea seller suicide due to harassment )

वैभव देवरे, सोनाली देवरे (रा. चेतनानगर), निखिल पवार (रा. राणेनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अटक केलेले सोनाली व निखिल यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धीरज विजय पवार (रा. सहदेवनगर, गंगापूर रोड) यांनी १५ तारखेला नांदूरी घाटात (ता. कळवण) गळफास घेत आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी त्यांची पत्नीने गंगापूर पोलिसात तिघा संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे.

त्यांचे पती धीरज यांनी आत्महत्त्या केल्याचे १६ तारखेला उघड झाले. तसेच, आत्महत्त्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी कळवण पोलिसांना मिळाली होती. कळवण पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद आहे. तर, फिर्यादीनुसार, त्यांचे पती धीरज यांनी संशयित वैभव देवरे याच्याकडून व्याजाने १२ लाख रुपये घेतले होते. या रकमेची व्याजासह त्यांनी ३२ लाख ४० हजारांची परतफेड केलेली आहे. तरीही संशयितांकडून धीरज यांना वसुलीसाठी दमदाटी करीत छळवणूक करीत होते.

तसेच त्यांच्या कुटूंबियांना जीव मारण्याचीही धमकी देत, त्यांच्या घरी जाऊन सोन्याच्या दागिन्यांची मागणी आणि गावाकडील शेतजमीन नावावर करून देण्याचीही धमकी देत. त्यास नकार दिल्याने कोर्या कागदावर व धनादेशावर धीरज यांच्या स्वाक्षर्या करून घेतल्या. यात तणावातून १५ तारखेला ते घरातून मित्राला भेटण्याचे कारण देत निघून गेले आणि १६ तारखेला त्यांनी आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले.

गुन्हेशाखेकडून अटक

गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर समांतर तपास शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी सुरू केला. याप्रकरणी संशयित देवरेची पत्नी सोनाली व शालक निखिल या दोघांना अटक केली. तर मुख्य संशयित वैभव देवरे पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोघांना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

वैभव देवरेवर सराईत

अवैध सावकारीसह आत्महत्त्येच प्रवृत्त करणे, खुनाचा प्रयत्न, फौजदारी कट, खंडणी, जबरी चोरी, गृहअतिक्रमण, खुनासाठी अपहरण करणे, खंडणी वसुलीसाठी दुखापत करणे, विनयभंग, संगनमताने धाकदडपशाही करणे, शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे संशयित तिघांविरोधात पाच गुन्हे इंदिरानगर पोलीसात तर, एक गुन्हा गंगापूर पोलिसात दाखल आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.