Winter Travel: फॉरेनपेक्षा कमी नाहीत भारतातील 'ही' ठिकाणं! नोव्हेंबरमध्ये फिरण्यासाठी Best; तुमच्या बजेटमध्ये प्रवास करू शकता
एबीपी माझा वेब टीम October 21, 2024 04:13 PM

Winter Travel: आता ऑक्टोबर (October) महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशात आता ऑक्टोबर हिट कमी होत असून कुठे परतीचा पाऊस तर कुठे थंडीची चाहूल लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात पावसाळा पूर्णपणे संपतो आणि हिवाळा सुरू होतो. या महिन्यात थंड वारे वाहू लागतात. वातावरण अगदी गुलाबी होते. कपल्ससाठी तर हा महिना अगदी रोमॅंटिक असतो. तर प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी हा महिना अतिशय योग्य आहे. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी फॉरेनपेक्षा कमी नाहीत. जिथे या ऋतूत भेट देणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. 
 

नोव्हेंबरमध्ये फिरण्यासाठी 'अशी' ठिकाण, जी तुमचं मन मोहून घेतील

नोव्हेंबर महिन्यात काही ठिकाणचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि गुलाबी होते. अशात, जर तुम्ही लॉंग पिकनिकचे नियोजन करत असाल, तर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात सहलीला जाऊ शकता. मित्र, कुटुंब, मुलं किंवा तुमच्या जोडीदारासोबत अशा ठिकाणी सहलीला जा, जेथे नोव्हेंबर महिन्यात प्रवास केल्याने तुमचे पैसे फुकट जाणार नाही. येथे तुम्हाला अशा ठिकाणांचे पर्याय दिले जात आहेत, जिथे तुम्ही या ऋतूत कमी पैशात भेट देऊ शकता...

कुर्ग - भारताचे स्कॉटलंड

दक्षिण भारतातील काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्ग शहराला भेट देण्यासाठी नोव्हेंबर महिना योग्य आहे. कुर्ग हे कर्नाटकात आहे. या ठिकाणाला भारताचे स्कॉटलंड असेही म्हणतात. हे एक छोटेसे हिल स्टेशन आहे, जिथे हिरवाई आणि नैसर्गिक सौंदर्य तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल. शांत ठिकाणांची आवड असणाऱ्यांसाठी आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे.

जैसलमेर -  मन मोहून टाकेल

पर्यटकांना राजस्थान खूप आवडते. येथील सौंदर्य आणि शहर लोकांना आकर्षित करतात पण उन्हाळ्यात लोक राजस्थानला जाणे टाळतात. त्यामुळे राजस्थानच्या सहलीला जात असाल तर नोव्हेंबर महिना योग्य राहील. या महिन्यात तुम्ही जैसलमेरला भेट द्यावी. येथील उत्सवी वातावरण, स्थानिक बाजारपेठ, किल्ले आणि राजवाडे, राजेशाही स्वागत तुमचे मन मोहून टाकेल. नोव्हेंबरमध्ये येथील वाळू थंड राहते, त्यामुळे उष्णता आणि घामाची चिंता न करता वाळवंटात फिरता येते.

उज्जैन - मध्य प्रदेशातील सर्वात मोठे आकर्षण

मध्य प्रदेशातील अनेक शहरे देखील भेट देण्यास खूप छान आहेत, तथापि, उन्हाळ्यात मध्य प्रदेशात जाण्याऐवजी नोव्हेंबरमध्ये येथे सहलीचे नियोजन करणे चांगले आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनला धार्मिक महत्त्व आहे. तुम्ही येथील महाकालेश्वर मंदिराला भेट देऊ शकता, जे शहरातील सर्वात मोठे आकर्षण आहे. या मोसमात येथील तलाव देखील पाहण्यासारखा आहे.

मनाली - इथले सौंदर्य या महिन्यात खुलते

जर तुम्हाला काही डोंगराळ आणि बर्फाळ ठिकाणाला भेट द्यायची असेल तर या महिन्यात जाणे योग्य ठरेल. या महिन्यात बर्फाच्छादित शिखरांवर पोहोचणे सोपे आहे. जास्त बर्फवृष्टी नसल्यामुळे तुम्ही सहज फिरू शकता. यासाठी तुम्ही नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेशातील सुंदर हिल स्टेशन मनालीला भेट देण्याचा विचार करू शकता. पाइनच्या जंगलांनी वेढलेल्या या ठिकाणाचे सौंदर्य या महिन्यात वाढते. बजेट ट्रिपसाठी मनालीला जा.

Travel: दिवाळीसाठी रेल्वेचं Advance तिकीट बुक करताय? 120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार नाही, बुकिंग प्रणालीतील बदल जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.