Benefits Of Star Anise: चक्रफुलाचे अगणित फायदे
Marathi October 21, 2024 04:25 PM

गरम मसाल्यांचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. पदार्थ बनवताना गरम मसाल्यांचा वापर केल्याने जेवणाची चव वाढते. या मसाल्यांमध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग यांसह चक्रफुलाचाही समावेश असतो. इतर मसाल्याप्रमाणेच चक्रफुलही आरोग्यदायी असते. यात अॅटी – ऑक्सीडंट, व्हिटॅमिन सी सारखे पोषकतत्वे आढळतात. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत होण्यापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांवर चक्रफुल प्रभावी उपाय मानला जातो. पाहूयात, चक्रफुलाचे सेवन शरीरासाठी कसे फायदेशीर ठरते,

चक्रफुलाचे फायदे –

चक्रफुलात व्हिटॅमिन सी जास्त आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. इतकचं नाही तर वजन कमी करण्यासाठी चक्रफुल प्रभावी समजले जाते. वेट लॉससाठी चक्रफुलाचे पाणी तुम्ही प्यायला हवे.

चक्रफुलातील घटकांमुळे शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत होते. म्हणजेच शरीर डिटॅॉक्सीफाइड होते आणि कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहते.

चक्रफुलात अॅटीऑक्सीडेट भरपूर प्रमाणात आढळतात. जे शरीराला घातक अशा फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

चक्रफुलामुळे पचनसंस्था सुधारते. तसेच शरीरातील जळजळ कमी होते. त्यामुळे तुम्हाला जर वारंवार अपचनाच्या समस्या जाणवत असतील, जसे की, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता तर चक्रफुलाचे सेवन करणे प्रभावी ठरेल.

चक्रफुलामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि शरीरातील पेशींना संरक्षण मिळण्यास मदत होते.

चक्रफुलामध्ये अॅटी मायक्रोबिअल गुणधर्म आढळतात. जे जिवांणूशी लढण्यास मदत करतात. ज्यामुळे तुम्हाला संसर्गजन्य आजार शरीरापासून दूर ठेवता येतात.

चक्रफुलामध्ये शामक गुणधर्म असतात. जे रात्री शांत झोप लागण्यासाठी फायदेशीर ठरतात. जर रात्री झोप लागण्यास अडचणी येत असतील तर झोपेच्या आधी एक कप चक्रफुल चहा घ्या.

शरीराप्रमाणेच केसांसाठी चक्रफुल वापरणे फायदेशीर ठरते. टाळूवर चक्रफुलाच्या तेलाने मालिश केल्यास केसांच्या वाढीस चालना मिळते.

कसे वापराल –

चक्रफुल तुम्ही पदार्थामध्ये वापरू शकता. यासाठी कोणताही पदार्थ बनवताना चिमूटभर चक्रफुलाची पावडर टाका. याव्यतिरिक्त तुम्ही नुसते चक्रफुलही खाऊ शकता. टाळूवर चक्रफुलाच्या तेलाने मालिश केल्यास केसांची वाढ होण्यास मदत होते.

 

 

 

 

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.