Nana Patole On Maharashtra Assembly Elections 2024 KP
Marathi October 21, 2024 05:25 PM


काल भाजपाकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर इतर पक्षांकडून लवकरच जागावाटपाची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच उद्या संध्याकाळी मविआचे तिन्ही नेते जागावाटप जाहीर करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त एक महिना शिल्लक राहिला आहे. त्यातच आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच काल भाजपाकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर इतर पक्षांकडून लवकरच जागावाटपाची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच उद्या संध्याकाळी मविआचे तिन्ही नेते जागावाटप जाहीर करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. (Nana Patole On Maharashtra Assembly Elections 2024)

हेही वाचा : Nana Patole : उद्या संध्याकाळी मविआचे तिन्ही नेते जागावाटप जाहीर करतील; पटोलेंनी काय सांगितले ?

– Advertisement –

उद्या काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले आहे. तसेच मेरिटच्या आधारावर उमेदवार देण्याबाबत चर्चा होणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील वाद विकोपाला चालला आहे. विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात टोकाचे वाद झाले आहेत. मात्र आज माध्यमांशी बोलताना आमच्यात विदर्भाच्या जागेवरून काहीच वाद नाही, असे पटोलेंनी सांगितले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत जागेसंदर्भात जे प्रश्न होते, त्याच्यावर आम्ही चर्चा केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची चर्चा झाली आहे. कॉंग्रेस हायकमांड आणि काँग्रेस पक्ष हा सामंजस्याची भूमिका घेणारा पक्ष आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Diwali Faral Price : दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका; बघा पदार्थांचे दर

– Advertisement –

महायुतीमध्ये सध्या संभ्रम सुरू आहे, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच आमच्यात कुठलेही वाद नाहीत. काल काही कारणास्तव आमची सीईसी रद्द झाली ती आज होत आहे. विदर्भातील कुठल्याच जागेबाबत आमच्यात वाद नाहीत. खर्गेसोबतच्या बैठकीमध्ये नाराजीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. तसेच ते म्हणाले, शरद पवारांनी कोणत्याही काँग्रेस नेत्यांना फोन केले नाहीत. कालपासून आम्ही दिल्लीमध्ये आहोत. त्यामुळे जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी नसीन खान शरद पवार यांच्याकडे गेले होते. शिवसेना काँग्रेसच्या जागा मागत आहे, असे काही नाही. शिवसेना उबाठा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नरेंद्र मोदी मोदी यांचे कौतूक केले आहे. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, प्रत्येक पक्षाला स्वतंत्र आहे. काय बोलावे, काय बोलू नये, हा त्यांचा प्रश्न आहे. (Nana Patole On Maharashtra Assembly Elections 2024)


Edited By Komal Pawar Govalkar



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.