खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
सूरज सावंत October 21, 2024 05:43 PM

कोल्हापूर : तीन दिवसांपूर्वी भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर आमदार सदाभाऊ खोत यांच्या सोबत भेट घेतली होती. या भेटीनंतर आज (21 ऑक्टोबर) धनंजय महाडिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर उत्तरमधून आणि शिराळा मतदारसंघासाठी धनंजय महाडिक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर उत्तरमधून धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत, तर शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांच्यासाठी धनंजय महाडिक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारी संदर्भात महाडिक यांच्या भेटीगाठी सुरू आहेत का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. 

 कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिकांना संधी

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजी मतदारसंघ असून यामध्ये कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इचलकरंजीमधून राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघ शिवसेना शिंदे गटासाठी सोडला जातो की, भाजपचा दावा मान्य केला जातो, याकडे सुद्धा लक्ष असेल. 2022 च्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या सत्यजित कदम यांना 80,000 हजारांवर मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपला सुद्धा उमेदवारी मिळावी असा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर यांची आपली उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर आणि शिरोळ या दोन मतदारसंघातील उमेदवारी उमेदवारीवरून धनंजय महाडिक यांच्या भेटीसाठी सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक इच्छुक आहेत. दुसरीकडे वाळवा इस्लामपूर मतदारसंघासाठी सदाभाऊ खोत प्रयत्नशील आहेत. त्यांनी किमान अडचणीतील मतदारसंघ आम्हाला द्यावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील महायुतीतुन दोन विधानसभा अजित पवार गटाकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत. वाळवा आणि तासगाव या विधानसभा अजित पवार गट लढवण्याचे संकेत आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी विरोधातच अजित पवार वाळवा आणि तासगाव विधानसभा क्षेत्रात उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. तासगावमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांना अजित पवार गटांकडून उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या  आहेत. संजयकाका पाटील मुंबईत जाऊन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.