मोठी बातमी : आयकर अधिकारी तालमीतही पोहोचले, महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेवर आयकर धाड!
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे October 22, 2024 04:13 PM

पुणे कोथरुडमध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीच्या तयारीत असलेल्या अमोल बालवडकरांच्या (Amol Balwadkar)  सासरी ईडीची धाड टाकण्यात आली आहे.  बालवडकर बंडखोरीच्या तयारीत असल्याने त्यांचे मेहुणे  डबल महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेच्या (Abhijeet Katke)  घरी ईडीची धाड टाकली आहे. एवढच नाही तर अभिजीत कटेकवर ज्या तालमीत सराव करतात तिथे देखील आयकर अधिकारी पोहलसे. भाजपचे  प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली होती . मात्र ते ऐकत नसल्याने ही इन्कम टॅक्सची रेड चर्चा रंगल्या आहे. 

डबल महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेंच्या पुण्यातील घरावर छापा टाकणारे इन्कम टॅक्सचे अधिकारी वारंवार आपलं नाव घेत असुन आपल्या उमेदवारीचा या छाप्याशी संबंध असल्याचा संशय भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केलाय . पैलवान अभिजीत कटके हा अमोल बालवडकर यांचा मेहुणा असून अमोल बालवडकर हे पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केलीय आणि त्यानंतर बालवडकर यांनी बंडखोरीचा त्यांचा पवित्रा कायम ठेवलाय. 

अभिजीत कटकेंच्या तालमीत  इन्कम टॅक्सचे अधिकारी

आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागेल असा इशारा अमोल बालवडकर यांनी दिलाय.  मंगळवारी सकाळी पैलवान अभिजीत कटकेच्या घरावर इन्कम टॅक्सकडून छापा टाकण्यात आला असून अभिजीत ज्या तालमीत सराव करतो त्या तालमीत देखील इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहचलेत. परंतु तालीमीत  काय मिळणार मातीच मिळणार आहे, असे अमोल बालवडकर म्हणाले. 

उमेदवारीसंदर्भात लवकर निर्णय जाहीर करणार :अमोल बालवडकर

आम्ही शेतकरी परिवारातून आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आम्ही आलेलो आहे. अशा प्रकारच्या ईडीची धाडी पडणे हे आमची प्रतिमा मलीन होण्यासारखे आहे. त्यामुळे नक्कीच हा प्रकार का घडला? याच्या मागे कोण आहेत, याच्या खोलात आम्ही जाणार आहे. उमेदवारी संदर्भात अद्याप कोणतीही भूमिका आम्ही जाहीर केली नाही. वेळ आल्यावर आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे देखील  अमोल बालवडकर म्हणाले. 

हे ही वाचा :

मोठी बातमी : डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.