Team India : बुधवारी टीम इंडिया आणि पाकिस्तानचा सामना, जाणून घ्या
GH News October 22, 2024 11:11 PM

एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेत टीम इंडिया ए ची युवा ब्रिगेड आतापर्यंत अजिंक्य आहे. टीम इंडियाने पहिल्या 2 सामन्यात पाकिस्तान आणि यूएईवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने तिलक वर्मा याच्या नेतृत्वात सोमवारी 21 ऑक्टोबरला यूएईचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. आता टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचा हा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे. तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानही उद्याच (23 ऑक्टोबर) अखेरचा सामना खेळणार आहे. या दोन्ही संघांच्या सामन्यांबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

बुधवारी अर्थात 23 ऑक्टोबरला एकूण 2 सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध यूएई आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर दुसरा आणि स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात ओमानसमोर टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. टीम इंडियाने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे ओमान विरुद्धचा सामना हा औपचारिकता असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला मात्र पाकिस्तानसाठी यूएई विरुद्धचा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीकोनातून आरपारचा असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे.

दरम्यान आतापर्यंत एकूण 2 संघच उपांत्य फेरीत पोहचले आहेत. या 2 संघांमध्ये टीम इंडियासह अफगाणिस्तानचा समावेश आहे. आता उपांत्य फेरीत पोहचणारे 2 संघ कोण असणार? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

पाकिस्तान ए टीम : मोहम्मद हारिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), यासिर खान, अराफत मिन्हास, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, हसीबुल्ला खान, मेहरान मुमताज, अब्बास आफ्रिदी, शाहनवाझ दहनी, अहमद दानियाल, मोहम्मद इम्रान आणि जमान खान.

यूएई टीम ए : बासिल हमीद (कर्णधार), तनिश सुरी, मयंक राजेश कुमार, विष्णू सुकुमारन, राहुल चोप्रा, सय्यद हैदर शाह (विकेटकीपर), निलंश केसवानी, संचित शर्मा, मुहम्मद फारूख, मुहम्मद जवादुल्ला, ओमिद रहमान, अंश टंडन, ध्रुव पाराशर, आर्यन शर्मा आणि अकिफ राजा.

इंडिया ए टीम : तिलक वर्मा (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, रमणदीप सिंग, अनुज रावत, हृतिक शोकीन, आर साई किशोर, राहुल चहर, आयुष बडोनी, नेहल वढेरा, रसिक दार सलाम, अंशुल कंबोज, आकीब खान, वैभव अरोरा आणि निशांत सिंधू

ओमान टीम ए : जतिंदर सिंग (कर्णधार), आमिर कलीम, करण सोनावले, वसीम अली, हम्माद मिर्झा (विकेटकीपर), मोहम्मद नदीम, मेहरान खान, सुफयान मेहमूद, शकील अहमद, समय श्रीवास्तव, मुझाहिर रझा, खालिद कैल, आकिब इलियास, शोएब खान, कश्यप प्रजापती, प्रतीक आठवले, झीशान मकसूद, रफीउल्ला, अयान खान आणि कलीमुल्ला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.