पहिला दिवस देवाचा! नमनाला नन्नाचा पाढा;आज एकही अर्ज दाखल नाही! ७ मतदारसंघात १०५ जणांनी १८८ अर्ज उचलले...
Buldanalive October 23, 2024 02:45 AM

मतदारसंघ निहाय माहिती याप्रमाणे : 22-मलकापूर विधानसभा मतदारसंघात 18 व्यक्तीनी 41 अर्ज, 23-बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 13 व्यक्तीनी 22 अर्ज, 24-चिखली विधानसभा मतदारसंघात 26 व्यक्तीनी 46 अर्ज, 24-सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 19 व्यक्तीनी 36 अर्ज, 25-मेहकर विधानसभा मतदारसंघात एकही अर्ज उचल नाही, 26-खामगांव विधानसभा मतदारसंघात 14 व्यक्तीनी 22 अर्ज व 27-जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 15 व्यक्तीनी 21 अर्ज असे एकूण 105 व्यक्तींनी 188 अर्ज उचल केले आहे.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि. 29 आक्टोंबर हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार दि. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.