Rohit Pawar’s target on the Mahayuti over crores of rupees caught in Pune msj
Marathi October 23, 2024 06:24 AM


लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

(Maharashtra Election 2024) मुंबई : पुढील महिन्यात 20 तारखेला राज्य विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये काल, सोमवारी एका गाडीतून कोट्यवधी रुपये पोलिसांनी जप्त केले. यावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी महायुतीला घेरण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (एनसीपी एसपी) आमदार रोहित पवार यांनी, अजून चार गाड्या कुठे आहेत? असा प्रश्न विचारला आहे. (Rohit Pawar’s target on the Mahayuti over crores of rupees caught in Pune)

केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचवेळी राज्यात आचारसंहितादेखील लागू झाली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांकडून गाड्यांची अत्यंत बारकाईने तपासणी होत आहे. अशातच सोमवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी भोरजवळ राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी गाडीची तपासणी करून अंदाजे पाच कोटी रुपये जप्त केले. ही गाडी पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती, अशी माहिती समोर आली आहे.

– Advertisement –

या पार्श्वभूमीवर एनसीपी एसपीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इन्स्टॉलमेन्ट म्हणून 25 – 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून सोमवारी यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या ‘डोंगार झाडी’मध्ये पकडली गेली, असे सांगत त्यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना लक्ष्य केले आहे. तसेच, एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा प्रश्नही विचारला आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Sanjay Raut : 15 कोटींचा पहिला हप्ता आमदारांना चालला होता, पण…; राऊतांचा कोणावर निशाणा?

लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर ‘रात्रीस खेळ’ करण्याचा महायुतीचा मंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता कायमचे घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करत भाजपा…; राऊतांचा गंभीर आरोप


Edited by Manoj S. Joshi





Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.