Sanjay Raut alleges that BJP is omitting names of voters from the voter list rrp
Marathi October 23, 2024 01:24 PM


महाविकास आघाडीची पहिली यादी कधी येईल याबाबत माहिती देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त मते मिळालेल्या मतदारसंघात अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळ्यात येत आहे. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करत भाजपा हे पाप करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपाने पाच दिवसांनी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याशिवाय महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच त्यांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. अशातच आता महाविकास आघाडीची पहिली यादी कधी येईल याबाबत माहिती देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. (Sanjay Raut alleges that BJP is omitting names of voters from the voter list)

पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना जागावाटपासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जागावाटपाचा प्रश्न आजच मार्गी लावला जाईल. कारण महाविकास आघाडीत सर्व सुरळीत असून कोणीही चिंता करू नये. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी काल आमची चर्चा झाली. या बैठकीनंतर शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षातील जागावाटपाबाबतचा तिढा सुटलेला आहे. आता एखादी जागा सोडल्यास आमच्यात कोणतेही मतभेद नाही. ते मतभेदही आज संध्याकाळपर्यंत दूर करण्यात येतील.

– Advertisement –

हेही वाचा – Nilesh Rane : स्वाभिमानी निलेश राणेंची भाजपाला सोडचिठ्ठी; उद्या धनुष्यबाण हाती घेणार

संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आज मुंबईत आले आहेत. ते शरद पवार यांची भेट घेतील आणि त्यानंतर मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहेत. यानंतर ते काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करून मतभेद दूर करतील. सध्या महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून सर्व सुरळीत सुरू आहे, अशी भूमिकाही संजय राऊत यांनी मांडली.

– Advertisement –

राऊतांचे भाजपावर गंभीर आरोप

दरम्यान, भाजपावर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त मते मिळालेल्या मतदारसंघात अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळ्यात येत आहे. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करत भाजपा हे पाप करत आहे. याचवेळी संजय राऊत यांना पुन्हा एकदा जागावाटपाचा तिढा कधीपर्यंत सुटेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज जागावाटपाबाबतचा तिढा सुटेल, अशी माहिती दिली.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : महाविकास आघाडीचेही ठरले, असा असेल फॉर्म्युला…


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.