AFG vs BAN : नबी-हशमतुल्लाची निर्णायक खेळी, बांगलादेशसमोर 236 धावांचं आव्हान, अफगाणिस्तान रोखणार?
GH News November 06, 2024 11:11 PM

अफगाणिस्तान क्रिकेट टीमने  बांगलादेशला पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानला बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर पूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. अफगाणिस्तानच्या बॅटिंगची दुर्दशा झाली होती. मात्र अनुभवी फलंदाज मोहम्मद नबी आणि कॅप्टन हशमतुल्लाह शाहीदी या दोघांनी केलेल्या खेळीमुळे अफगाणिस्तानला बांगलादेशसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. अफगाणिस्ताने 49.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 235 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी मोहम्मद नबी याने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर कॅप्टन हशमतुल्लाह शाहीदी याने 52 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून तास्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर शोरीफूल इस्लाम याला 1 विकेट मिळाली.

अफगाणिस्तानची बॅटिंग

अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र अफगाणिस्तानची घसरगुंडी झाली. बांगलादेशने अफगाणिस्तानला ठराविक अंतराने झटके दिले. गुरुबाजने 5, रहमतने 2, सेदीकुल्लाह अटल 21, अझमतुल्लाह शाहीदी 0 आणि गुलाबदीन नायब 22 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे अफगाणिस्तानची स्थिती 5 बाद 71 अशी झाली. मात्र त्यानंतर हशमतुल्लाह शाहीदी आणि मोहम्मद नबी या दोघांनी निर्णायक शतकी भागीदारी करत अफगाणिस्तानचा डाव सावरला.

सहाव्या विकेटसाठी शतकी आणि निर्णायक भागीदारी

हशमतुल्लाह शाहीदी आणि मोहम्मद नबी या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शाहीदी आऊट झाला. शाहीदीने 92 बॉलमध्ये 52 रन्स केल्या. त्यानंतर राशीद खान याने 10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. राशीदनंतर मोहम्मद नबीही बाद झाला. नबीने 79 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 84 धावा केल्या. अलाह गझनफक आणि फझलहक फारुकी या दोघांना भोपळाही फोडता आला नाही.

बांगलादेशसमोर 236 धावांचं आव्हान

अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, रशीद खान, अल्लाह गझनफर, नांगेलिया खरोटे आणि फजलहक फारूकी.

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनझिद हसन, सौम्या सरकार, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.