मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम November 06, 2024 11:13 PM

Sharad Pawar: आमचं सरकार आल्यावर आम्ही कृषी समृद्धी योजना ( Krishi Samrudhi Yojana) लागू करणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख (SP) शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याचं (Farmers) 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचं प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत करणार असल्याचे पवार म्हणाले.

शेतकरी हा तुमच्या माझ्या भुकेची समस्या सोडवणारा राजा आहे. मात्र, सध्या तो सकंटात आहे. या भाजपच्या सरकानं शेतकऱ्यांच्या दु:खाकडे बघितलं नसल्याची टीका शरद पवार यांनी केली. आज मुंबई महाविकास आघाडीची जाहीर सभा होत आहे. या सभेत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी जाहीर

यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच जातनिहाय जनगणना करणार असून 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार तसेच  25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत करणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे.

महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या महत्वाचं राज्य 

महाराष्ट्र हे देशातील महत्वाचं राज्य आहे. आर्थिकदृष्ट्या आपलं राज्य महत्वाचं असल्याचे शरद पवार म्हणाले. उद्योगाच्या, गुंतवणुकीच्या बाबतीत मागे राहिला असल्याचे शरद पवार म्हणाले. आज राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्यामध्ये 64000 महिला आणि मुली बेपत्ता आहेत. त्याचा तपास लागत नाही असे शरद पवार म्हणाले. आज शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे शरद पवार म्हणाले. भ्रष्टाचार कोणत्या टोकाला गेला याचे उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा. या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्याचे शरद पवार म्हणाले. गेट वे ऑफ इंडियाचा पुतळा किती काळापासून उभा आहे. त्याला काही झालं नाही
पण मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा पडतो. यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान 
या सरकारमनं मोठा भ्रष्टाचार करण्याचं काम केल्याचे शरद पवार म्हणाले.  

काळ्या दगडावरची पांढरी रेष! राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार, नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.