Ranji Trophy 2024: 'लाज कशी वाटत नाही...' अंकित बावणेच्या विकेटवर Ruturaj Gaikwad संतापला
esakal November 08, 2024 05:45 AM

Ruturaj Gaikwad Reacts on Ankit Bawne Wicket in Rnaji Trophy 2024: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेतील सर्विसेसविरूद्धच्या सामन्यात महाराष्ट्राचा डाव एकहाती सांभाळत असणारा कर्णधार अंकित बावणे झेलबाद झाला. अंकितला झेलबाद देणे हा पंचांचा निर्णय पुर्णत: चुकीचा आहे, म्हणत ऋतुराज गाकवाडने संताप व्यक्त केला. इंन्साग्रामवर स्टोरी शेअर करत, लाईव्ह सामन्यात असे कसे काय घडू शकते ? असा ऋतुराजने प्रश्न विचारला.

ऋतुराज गायकवाड सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरूद्धच्या कसोटी मालिकेत ऋतुराज भारत 'अ' संघाचे नेतृत्व करत आहे. ऋतुराजने इन्साग्राम स्टोरीमध्ये अंकितच्या कॅचचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये स्लिपमध्ये अंकितचा झेल पकडण्यापुर्वी चेंडूचा जमिनीला स्पर्श झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंचांच्या या चुकिच्या निर्णयाचा निषेध करत ऋतुराजने स्टोरीमध्ये लिहिले की, "लाईव्ह सामन्यामध्ये हे कसे दिले जाऊ शकते? या कॅचसाठी अपील करायला लाज कशी वाटत नाही. हे पूर्णपणे दयनीय आहे."

Ruturaj Gaikwad

ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यामुळे अंकित बावणेवर महाराष्ट्र संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्राने सर्विसेस संघाचा पहिला डाव २९३ धावांवर रोखला. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या हितेश वलुंजने सर्विसेस संघाचे ५ विकेट्स घेतले. प्रत्युत्तरात उतरलेल्या महाराष्ट्राला चांगली सुरूवात करता आली नाही. सलामीवीर सिद्धेश वीर(४) व मुर्तझा ट्रंकवाला (१८) धावांवर बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला सुहास धस ३० धावा करून माघरी परतला. मुंबईचा डाव एका बाजूने घसरत असताना, दुसऱ्या बाजूने कर्णधार अंकित बावणेने महाराष्ट्राच्या खात्यात धावा गोळा करत होता. महाराष्ट्राचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंकितला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.

शेवटी ५० व्या षटकात अंकितच्या बॅटला स्पर्श करून चेंडू स्लिपमध्ये उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडे गेला. त्यानंतर क्षेत्ररक्षकाकडून अपील करण्यात आले आणि पंचांनी अंकितला बाद घोषित केले. नंतर मुंबईचा डाव पुर्णत: घसरला. मुंबईने पहिल्या डावात अवघ्या १८५ धावा केल्या.

त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या सर्विसेस संघाने दिवसाअंतीपर्यंत १५ धावा केल्या आणि सामन्यात १२३ धावांची आघाडी घेतली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.