L k Advani : स्वयंसेवक ते देशाचे उपपंतप्रधान, असा आहे लालकृष्ण अडवानी यांचा प्रवास
Sarkarnama November 08, 2024 01:45 PM
L k Advani स्वंयसेवक

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात झाला.विद्यार्थीदशेपासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते.

L k Advani जनसंघाची स्थापना

श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये भारतीय जनसंघची स्थापना केली तेव्हा अडवाणी यांना राजस्थानमधील पक्षाच्या शाखेचे सचिव करण्यात आले. 1970 पर्यंत ते या पदावर राहिले.

L k Advani जनासंघाचे अध्यक्ष

1973 ते 1977 पर्यंत अडवाणी हे जनसंघाचे अध्यक्षपद भूषवले. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा ते पक्षाचे संस्थापक सदस्य होते.

L k Advani भाजपचे अध्यक्ष

अडवाणी 1980 ते 1986 पर्यंत भाजपचे सरचिटणीस होते. अडवाणी यांनी तीन वेळा भाजपचे अध्यक्षपद भूषवले आहे.

L k Advani 9 वेळा खासदार

अडवाणी 5 वेळा लोकसभा आणि 4 वेळा राज्यसभेचे खासदार होते. 1977 ते 1979 या काळात ते पहिल्यांदा केंद्रात मंत्री झाले. या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला.

L k Advani राम मंदिरासाठी 'रथ यात्रा'

अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली.

L k Advani गृहमंत्री, उपपंतप्रधान

अटलबिहार वाजपेयी हे पंतप्रधान असताना 1999 ते 2004 या कालावधीत एनडीए सरकारच्या काळात लालकृष्ण अडवानी हे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते.

L k Advani भारतरत्न पुरस्कार

देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने अडवानी यांना सन्मानित करण्यात आले.

Donald Trump NEXT : डोनाल्ड ट्रम्प यांचे पुण्याशी आहे विशेष नाते!
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.