काय कॅच पकडला राव! अभिषेक शर्माने मारला सेफ झोनमध्ये, एडन मार्करम उलटा धावत गेला आणि..
GH News November 09, 2024 12:09 AM

टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर हा निर्णय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या मनासारखा झाला होता. त्यालाही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची होती. भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानी सुरुवात केली. दोघांची आक्रमक अंदाज असल्याने पहिल्या षटकापासून चौकार षटकार बघायला मिळणार याची कल्पना होती. पहिलंच षटक मार्को यानसेननं टाकलं आणि फक्त 2 धावा दिल्या. पण दुसऱ्या षटकासाठी एडन मार्करम आला आणि पहिल्या चेंडूपासून भारतीय खेळाडूंनी सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने चौकार मारला आणि आक्रमक अंदाज दाखवून दिला. त्यानंतर एक धाव घेत संजू सॅमसनला स्ट्राईक दिली. संजू सॅमसननेही चौकार मारला आणि भारतीय फलंदाजांच्या मनात काय सुरु आहे ते दाखवून दिलं. त्यामुळे दक्षिण अफ्रिकन कर्णधाराने तिसरं षटक फिरकीपटू केशव महाराजच्या हाती सोपवलं.

संजू सॅमसनने केशव महाराजचं स्वागतही चौकार आणि षटकाराने केलं. त्यामुळे कर्णधार एडन मार्करमला वेगवान अस्त्र काढण्याशिवाय पर्याय नव्हता. गेराल्ड कोएत्झीला गोलंदाजीसाठी बोलवलं आणि पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला जाळ्यात ओढलं. खरं तर अभिषेक शर्माने मारलेला झेल सेफ झोनमध्ये होता. पण कर्णधार एडन मार्करमने वर चढलेला चेंडूवर नजर कायम ठेवली. तसेच उलटा धावत जात अप्रतिम झेल पकडला. समालोचकही हा झेल पकडेपर्यंत सेफ झोनमध्ये असल्याचं बोलत होते. पण एडन मार्करमने कोणतीही चूक न करता अप्रतिम झेल पकडला. त्यामुळे अभिषेक शर्माचा डाव 7 धावांवरच आटोपला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर.

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.