बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड November 10, 2024 10:43 AM

Maharashtra Assembly election 2024: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा लढवणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर बीडमध्ये शनिवारी झालेल्या शरद पवारांच्या सभेत आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील असं संदीप क्षीरसागर यांनी म्हणलंय. 

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला आता केवळ 10 दिवस उरले आहेत. दरम्यान, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा प्रचार मोठ्या दणक्यात सुरु झालाय. दरम्यान, बीडमधील सभेत जरांगे दादा पाटील म्हणतील तसं.. म्हणत संदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्याची एकच चर्चा आहे. 

काय म्हणाले संदीप क्षीरसागर?

खूप दिवस चर्चा होती माझ्यासोबत लोक नव्हते पण आता हे लोक पहा. माझ्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना चांगला भाव दिला.विकास कामाचा प्रस्ताव मात्र सत्ताधाऱ्यांकडून निधी थांबवला गेला आहे. एक दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यावर काळी चादर पसरली होती. लोकांमध्ये तेढ निर्माण केला हे शांत करण्यासाठी आम्हाला रस्ता उतरावे लागलं. या निवडणुकीत रावणाला दहन करण्याचे काम ही जनता करणार आहे . पवारांचा मुक्काम म्हणजे भूकंप आहे . असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

ठाकूर तू गयौ : संदीप क्षीरसागर

मी एकमेव आमदार आहे ज्याला कोणत्याच गावात प्रचारादरम्यान अडवलं नाही . आता कसं तर जरांगे दादा पाटील म्हणतील तसं असं म्हणत संदीप क्षीरसागर यांच्याकडून भाषणातच जरांगेंचा उल्लेख झाल्यानं चर्चेला उधाण आलंय. आता यात कोणीही मॅनेज नाही असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारानिमित्त बीडच्या परळीत सभेला संबोधित केलं. राजेसाहेब देशमुख परळी विधानसभा मतदारसंघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीला तीन नेते जबाबदार असल्याचं सांगितलं. या सभेत त्यांनी त्या तीन नेत्यांची नाव सांगण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं. मात्र, शरद पवार यांनी परळीत येऊन हे वक्तव्य केल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. 

परळीत पक्ष फोडणाऱ्यांसदर्भात वक्तव्य, शरद पवारांचा रोख कुणाकडे?

पक्ष म्हणून काही संकट आली. अनेक अडचणी आहेत. राजकीय पक्ष उभा केला, काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये तीन लोक प्रामुख्याने होते. राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे, सहकाऱ्यांमध्ये गैर विश्वास वाढवणारे दोन तीन लोक होते. त्या दोन तीन लोकांमध्ये कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला. ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवण्याची भूमिका घेतली. ज्यांनी बीड जिल्ह्याचा आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला उद्याच्या निवडणुकीत पराभूत करा. राजेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असं शरद पवार म्हणाले. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.