नरेंद्र मोदी रॅली मुंबई अजित पवार: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथे जाहीर सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांची संध्याकाळी सहा वाजता सभा पार पडणार आहे. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा मोदी आज घेणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार नरेंद्र मोदींच्या मुंबईतील या सभेला गैहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल मुंबईतील सभेला नसतील, असं सांगण्यात येत आहे. मात्र असे असलं तरी अजित पवारांचं नरेंद्र मोदींच्या सभेला गैहजर राहण्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कालच अजित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना बटेंगे तो कटेंगे हा नारा आम्हाला मान्य नाही, असं म्हटलं होतं. आम्ही शाहू,फुले आंबेडकरांच्या विचारसणीने जाणारा पक्ष आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज अजित पवार नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित राहणार नसल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहे.
-सकाळी 11 वाजता निफाड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ सभा ( पिंपळगाव हायस्कूल मैदान पिंपळगाव बसवंत ता. निफाड जि. नाशिक )
-दुपारी 1.30 वाजता दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ सभा ( खंडेराव मंदिर मौजे कसबेवणी वस्ती ता. दिंडोरी, जि. नाशिक )
-सायंकाळी 4 वाजता सिन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ सभा (तहसील कार्यालय मैदान सिन्नर ता. सिन्नर, जि. नाशिक)
-सायंकाळी 5.30 वाजता अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ सभा (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव जि. अहिल्यानगर)
भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. हा विशेष संवाद नमो ॲपच्या माध्यमातून वऑनलाइन पद्धतीनं साधला जाईल. येत्या 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपने आपल्या गोटातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशानं या महत्त्वपूर्ण उपक्रमाची आखणी केली आहे. या संवादाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या निवडणूक रणनितीला बळकटी देतील आणि बुथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा-निर्देश देतील.
अधिक पाहा..