आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
भिकेश पाटील, एबीपी माझा November 14, 2024 03:43 PM

Rahul Gandhi : नरेंद्र मोदीजी म्हणतात की हे संविधान पोकळ आहे, पण आयुष्यात ते वाचलं नसल्याने त्यांना ते रिकामं वाटतं. हे संविधान रिकामं नसून हजारो वर्षांची विचारसरणी, बुद्ध देवाची विचारसरणी, फुले, आंबेडकरांची विचारसरणी आहे. गांधींच्या विचाराचा, हा भारत आहे. होय, ते पोकळ नाही, भारताचे ज्ञान, भारताचा आत्मा आहे आणि रिकामं असा उल्लेख करून तुम्ही भारताचा अपमान करत आहात, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी आणि रंगावरून बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर कडाडून हल्लाबोल केला. 

संविधानाचा रंग कोणता आहे, ते निळे आहे, ते लाल आहे याने आम्हाला फरक पडत नाही, आम्ही त्यामध्ये काय लिहिले आहे ते संरक्षित करतो. काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी त्यासाठी बलिदान द्यायला तयार आहोत, असे राहुल म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.