लिस्टिंगलाच आयपीओने दिला नफा, विमा कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी ठरले फायद्याचे
ET Marathi November 14, 2024 04:45 PM
मुंबई : सामान्य विमा क्षेत्रातील कंपनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या आयपीओ (Niva Bupa Health Insurance Ipo) मध्ये पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी सहा टक्क्यांहून अधिक कमाई केली. आयपीओमध्ये शेअर्सची किंमत 74 रुपये हाेती. शेअर्स आज बीएसईमध्ये 78.50 रुपयांवर लिस्ट झाले. म्हणजे आयपीओ किमतीपेक्षा गुंतवणूकदारांना 4.50 रुपये फायदा झाला. शेअर बाजारात काय कल?गुरुवारी सकाळी 10 वाजता निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सचे शेअर्स Niva Bupa Health Insurance Shares) बीएसईवर 78.50 रुपयांवर लिस्ट झाले. लवकरच शेअर्स 80.94 रुपयांवर गेला. त्यानंतर ताे 76 रुपयांपर्यंत घसरला. नंतर त्यात सुधारणा झाली. आयपीओ कधी उघडला?हा आयपीओ 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला होता. आयपीओमध्ये अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख 6 नोव्हेंबर होती. कंपनीला अँकर गुंतवणूकदारांकडून 990 कोटी रुपये मिळाले आहेत. या काळात सर्व देशी-विदेशी कंपन्यांनी पैसे गुंतवले होते. किंमत 70 ते 74 रुपये निश्चित करण्यात आली होती. आयपीओचा आकार घटवलानिवा बुपा यांनी यापूर्वी आयपीओद्वारे 3,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली होती. मात्र नंतर ते 2,200 कोटी रुपये करण्यात आले. या आयपीओमध्ये 800 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्यात आले. तर प्रवर्तकांनी 1,400 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फाॅर सेल (OFS) मध्ये विकले. संमिश्र प्रतिसाद निवा बुपाचा आयपीओ 7-11 नोव्हेंबर दरम्यान खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि प्रत्येक श्रेणीसाठी राखीव भाग पूर्णपणे भरला गेला नाही. एकूणच हा आयपीओ 1.90 पट भरला गेला. यामध्ये, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) आरक्षित भाग 2.17 पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) भाग 0.71 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी भाग 2.88 पट भरला. कंपनी नवीन समभागांद्वारे उभारलेल्या पैशाचा उपयोग तिची सॉल्व्हेंसी पातळी मजबूत करण्यासाठी, भांडवली पाया वाढवण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी करेल. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सबद्दलया आरोग्य विमा कंपनीची स्थापना 2008 साली झाली. हा बुपा ग्रुप आणि फेटल टोन एलएलपी यांचा संयुक्त उपक्रम आहे. ही कंपनी स्थापन झाली तेव्हा तिचे नाव मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी होते. नंतर ते निवा बुपा हेल्थ इन्शुरन्समध्ये बदलले गेले. यामध्ये, बुपा सिंगापूर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडकडे 62.19 टक्के हिस्सा आहे तर फॅटल टोन एलएलपीकडे 26.8 टक्के हिस्सा आहे. कंपनी व्यक्तींना तसेच समूह उत्पादनांना आरोग्य विमा प्रदान करते.त्याचा व्यवसाय देशातील 22 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेला आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.