मुंबई: (Maharashtra Assembly Election 2024 Candidate list) राज्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला चांगलाच जोर धरला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदार राजा विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणूकीचे निकाल जाहिर होतील. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यातील 3 हजार 859 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता रिंगणात 4 हजार 136 उमेदवार उतरणार आहेत. प्रत्त्येक जिल्ह्यानुसार किती उमेदवार रिंगणात असणार आहे याची आकडेवारी जाणून घेऊया. तसेच यामध्ये महिला उमेदवार किती आणि पुरूष उमेदवार किती हे देखील जाणून घेऊया.
कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार अशी आहे आकडेवारीनंदुरबार जिल्ह्यात एकूण 31 उमेदवार आहेत यापैकी 28 पुरूष तर 3 महिला उमेदवार आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण 56 उमेदवार आहेत यापैकी 49 पुरूष तर 7 महिला उमेदवार आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण 139 उमेदवार आहेत यापैकी 121 पुरूष तर 17 महिला उमेदवार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 115 उमेदवार आहेत यापैकी 103 पुरूष तर 12 महिला उमेदवार आहेत. अकोला जिल्ह्यात एकूण 70 उमेदवार आहेत यापैकी 65 पुरूष तर 5 महिला उमेदवार आहेत. वाशिम जिल्ह्यात एकूण 62 उमेदवार आहेत यापैकी 54 पुरूष तर 8 महिला उमेदवार आहेत. अमरावती जिल्ह्यात एकूण 160 उमेदवार आहेत यापैकी 140 पुरूष तर 20 महिला उमेदवार आहेत. वर्धा जिल्ह्यात एकूण 60 उमेदवार आहेत यापैकी 53 पुरूष तर 7 महिला उमेदवार आहेत.
नागपूर जिल्ह्यात एकूण 2017 उमेदवार आहेत यापैकी 201 पुरूष तर 16 महिला उमेदवार आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण 50 उमेदवार आहेत यापैकी 46 पुरूष तर 4 महिला उमेदवार आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण 64 उमेदवार आहेत यापैकी 62 पुरूष तर 2 महिला उमेदवार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 29 उमेदवार आहेत यापैकी 23 पुरूष तर 6 महिला उमेदवार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 94 उमेदवार आहेत यापैकी 86 पुरूष तर 8 महिला उमेदवार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात एकूण 102 उमेदवार आहेत यापैकी 99 पुरूष तर 3 महिला उमेदवार आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण 165 उमेदवार आहेत यापैकी 150 पुरूष, 14 महिला आणि 1 तृतीयपंथी उमेदवार आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकूण 53 उमेदवार आहेत यापैकी 51 पुरूष तर 2 महिला उमेदवार आहेत.
परभणी जिल्ह्यात एकूण 58 उमेदवार आहेत यापैकी 55 पुरूष तर 3 महिला उमेदवार आहेत. जालना जिल्ह्यात एकूण 109 उमेदवार आहेत यापैकी 101 पुरूष तर 8 महिला उमेदवार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 183 उमेदवार आहेत यापैकी 165 पुरूष तर 18 महिला उमेदवार आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण 196 उमेदवार आहेत यापैकी 176 पुरूष तर 20 महिला उमेदवार आहेत. पालघर जिल्ह्यात एकूण 53 उमेदवार आहेत यापैकी 50 पुरूष तर 3 महिला उमेदवार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण 244 उमेदवार आहेत यापैकी 211 पुरूष तर 33 महिला उमेदवार आहेत. मुंबई उपनगरीय जिल्ह्यात एकूण 315 उमेदवार आहेत यापैकी 276 पुरूष तर 39 महिला उमेदवार आहेत.
मुंबई शहरात एकूण 105 उमेदवार आहेत यापैकी 95 पुरूष तर 10 महिला उमेदवार आहेत. रायगड जिल्ह्यात एकूण 73 उमेदवार आहेत यापैकी 63 पुरूष तर 10 महिला उमेदवार आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 303 उमेदवार आहेत यापैकी 282 पुरूष तर 21 महिला उमेदवार आहेत.अहमदनगर् जिल्ह्यात एकूण 151 उमेदवार आहेत यापैकी 142 पुरूष तर 9 महिला उमेदवार आहेत. बीड जिल्ह्यात एकूण 139 उमेदवार आहेत यापैकी 127 पुरूष तर 12 महिला उमेदवार आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण 106 उमेदवार आहेत यापैकी 103 पुरूष तर 3 महिला उमेदवार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 66 उमेदवार आहेत यापैकी 61 पुरूष तर 5 महिला उमेदवार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकूण 184 उमेदवार आहेत यापैकी 179 पुरूष तर 5 महिला उमेदवार आहेत. सातारा जिल्ह्यात एकूण 109 उमेदवार आहेत यापैकी 102 पुरूष तर 7 महिला उमेदवार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 38 उमेदवार आहेत यापैकी 36 पुरूष तर 2 महिला उमेदवार आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यात एकूण 17 उमेदवार आहेत यापैकी 15 पुरूष तर 2 महिला उमेदवार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 121 उमेदवार आहेत यापैकी 110 पुरूष तर 11 महिला उमेदवार आहेत. सांगली जिल्ह्यात एकूण 99 उमेदवार आहेत यापैकी 91 पुरूष तर 8 महिला उमेदवार आहेत. सर्वाधिक महिला उमेदवार मुंबई उपनगरातून लढत आहेत.
Edited By- नितीश गाडगे
Maharashtra Assembly Election 2024 Candidate list District wise NSG90