Guru Nanak Jayanti 2024 Wishes: गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा ! आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा हे मराठी मेसेज
Wishes In Marathi: कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला गुरु नानक जयंती साजरी केली जाते. यंदा हा सण 15 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. गुरुनानक देव हे शीख धर्माचे संस्थापक होते. त्यामुळे त्यांची जयंती हा शीख बांधवांसाठीचा महत्वाचा सण आहे. गुरु नानक जयंतीनिमित्त तुम्हाला कोणाला शुभेच्छा संदेश, कोट्स, वॉलपेपर आणि फोटो पाठवायचे असतील तर या लेखातील माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल. ( In Marathi)
गुरु नानक यांची 555 वी जयंतीगुरु नानक जयंतीच्या दिवशी शीख समाजातील लोक गुरुद्वारांमध्ये जातात आणि गुरु नानक देव यांचे स्मरण करतात. या दिवशी भव्य रॅलीचेही आयोजन केले जाते. या दिवसाला गुरु पर्व अथवा गुरु नानक प्रकाश उत्सव असेही म्हटले जाते. यंदा गुरु नानक देव यांची 555 वी जयंती साजरी केली जाणार आहे.
गुरु नानक यांचा जन्मगुरु नानक देव यांचा जन्म 15 एप्रिल 1469 ला तलवंडी या ठिकाणी झाला. त्यांनी अरबी, फारसी तसेच संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्यांनी कायम ईश्वर सेवा, सत्य आणि लोकांची सेवा यावर भर दिला. गुरुनानक यांचा नानकदेव, बाबा नानक, नानक शाहजी या नावांनीही संबोधले जाते. त्यांनी एक ओंकार अर्थात एकच देव असा संदेश दिला.
गुरु नानक जयंतीनिमित्त मराठी शुभेच्छा संदेश ( And Quotes In Marathi)
1)जगाला एकात्मता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या गुरू नानकजींच्या जयंतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
2)शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
3)‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा महान संदेश देणारे गुरु नानक देव यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा!
4)जगातील सर्व मानव समान आहेत, असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
5)तमाम शीख बंधु-भगिनींना गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
6) वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरुजी की फतेह, गुरू नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
7)हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, दुर्गुणांवर मात करणे आवश्यक आहे. असा संदेश देणारे महान व्यक्तिमत्व असलेल्या गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा !
8)देव एक आहे. नेहमी एकाच देवाची उपासना करा. देव सगळीकडे आणि प्रत्येक जीवात विराजमान आहे. जे देवाची उपासना करतात त्यांना कोणाचेही भय नसते.- गुरु नानक देव जी
गुरु नानक यांचे विचार
- देव एकच आहे.
- नेहमी एका देवाची उपासना करण्यावर लक्ष केंद्रित करा.
- प्रामाणिकपणा आणि मेहनतीने पोट भरले पाहिजे.
- वाईट गोष्टी करण्याचा किंवा कोणालाही त्रास देण्याचा विचारदेखील कधी मनात आणू नका.
- देवाच्या भक्तीत तल्लीन असलेले लोक कोणालाही घाबरत नाहीत.