Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराचा जोमाने प्रचार करत आहेत. दरम्यान, दक्षिण नागपुरात (South Nagpur Assembly) युती धर्मावर रक्ताच नातं भारी पडतंय का? असा सवाल विचारला जातोय. त्यामागील कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव (Kiran Pandav) महायुती उमेदवाराचा प्रचार करत नसल्याची तक्रार भाजप उमेदवार मोहन मते (Mohan Mate) यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
किरण पांडव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे विश्वासू मानले जातात. तर दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रामधून काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. गिरीश पांडव हे किरण पांडव यांचे बंधु असून ते युतीधर्म न पाळता आमच्या छोट्या कार्यकर्त्यांना बोलावून पैसे देऊन बैठका घ्यायला लावत आहे, असा आरोप भाजप उमेदवार मोहन मते यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते किरण पांडव हे युतीचा धर्म निभवत नाहीये. ते फक्त लोकांना बोलवून लक्ष्मी दर्शन घडवून फोडणे हाच त्यांचा धंदा आहे. तसेच आमच्या छोट्या कार्यकर्त्यांना बोलावून पैसे देऊन बैठका घेणे हेच काम त्यांचे सुरू आहे. मात्र आमचे कार्यकर्ते विकले जाणार नाही की त्यांनी त्यांचं काम करावा. मात्र एकनाथ शिंदे साहेबांना मी या संदर्भात तक्रार केली असून एकनाथ शिंदे या बाबत योग्य तो निर्णय करतील. किरण पांडव आमच्या अनेक कार्यकर्त्यांना फोन करत आहेत. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. मी थेट एकनाथ शिंदे सोबत वन-टू-वन या संदर्भात बोललो आहे की तुमच्या पक्षाचे लोक असं करत आहे, त्यामुळे युतीचा धर्म निभवा असेही सांगितले असल्याचे मोहन मते म्हणाले.
हे ही वाचा