हृदयद्रावक! मुलानेच केली जन्मादात्या आईची निर्घृण हत्या, नंतर स्वतालाही संपवलं; घटनेनं परिसर हादरला  
देवेंद्र रहांगडाले November 16, 2024 09:43 PM

Gondia News गोंदियागोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. यात जन्मदात्या आईची हत्या आणि त्यानंतर मारेकऱ्याने आत्महत्या केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. यात दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध आईकडे पैसे मागितले आणि तिने पैसे न दिल्याने आईवर कुऱ्हाडीने (Crime News) वार करून खून केला असल्याचा थराराक प्रसंग घडला आहे. या हत्येनंतर आरोपी मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या देखील केली आहे. या घटनेनंतर मात्र परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

आईची हत्या केल्यानंतर मुलाची विहिरीत उडी

मिळालेल्या माहितीनुसार मृतक आईचे नाव सुलकनबाई बनोठे (वय वर्ष 75) तर लेखराज बनोठे (वय वर्ष 54) असे आरोपी मृतक मुलाचे नाव आहे. सुलकनबाई बनोठे व तिचा मुलगा लेखराज बनोठे हे  एकत्र राहत होते. रात्री लेखराज बनोठे याने आई सुलकनबाई हिला दारू पिण्याकरिता पैसे मागितले. मात्र आईने पैसे न दिल्याने मुलाने रागाच्या भरात आईवर कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला. यात सुलकनबाई गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर आईचा मृत्यू झाल्याचे आरोपी मुलाला कळताच आरोपी मुलाने देखील  घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती आज(शनिवार) सकाळी सालेकसा पोलिसांना मिळाल्यानंतर घटनेची नोंद करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी माजी उपसरपंचसह एकाची हत्या 

दरम्यान, अशीच एक घटना सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात घडली आहे. यात  माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करुन खुण करण्यात आलाय. गुरुवारी पहाटे सहा वाजता मॉर्नींग वॉकसाठी गेलेल्या विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या भागातील कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीसांकडे दिली होती. त्यानंतर आज विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तूकडे खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आलेत. बाबू मामे याने काही दिवसांपुर्वी विठ्ठल भामे यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जग्वार कार किंवा दोन कोटी रूपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती.

इतर महत्वाची बातमी 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.