पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे. खाद्यतेलाचे भाव प्रति किलो ५० रुपयांनी वाढले आहेत. त्या तुलनेत सोयाबीनचे भाव मात्र मात्र ४ हजार रुपयांच्या पुढे जायला तयार नाहीत. सोयाबीन कापूस प्रश्नावर कोणताही आमदार सभागृहात बोलत नाही, शेतकरी मेला तरी यांना फरक पडत नाही. त्यामुळे पुढच्या काळात सोयाबीन कापूस या प्रश्नावर आपला लढा सभागृहात सुरू करणार असल्याचेही डॉ. ऋतुजा चव्हाण म्हणाल्या. मेहकर लोणार मतदार संघातील शेतकरी आपल्या पाठीशी आहेत, सर्व जाती धर्म पंथ संप्रदायांची माणसेही आपल्या सोबत असल्याने विजय होईलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.