सोलापूर : जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघापैकी 3 मतदारसंघ हे सोलापूर शहरात येतात. त्यामध्ये, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर मध्य हे मतदारसंघ आहेत. त्यातील सोलापूर शहर उत्तर (सोलापूर उत्तर) विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत असून भाजपा महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये लढाई होत आहे. त्यामध्ये, भाजपकडून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महेश कोठे यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, विजयकुमार देशमुख यांचं तिकीट जाहीर झाल्यानंतरही भाजप नेत्या शोभा बनशेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विधानसभा निवडणुकीतील आपली लढत कायम ठेवली. त्यामुळे, मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
सोलापूर उत्तर मतदारसंघात गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली होती. त्यामध्ये, भाजपचे विजयकुमार देशमुख हे तब्बल 77,324 मतांनी विजयी झाले. त्यांनी, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर सपाटे यांचा त्यांनी पराभव केला होता. विजयकुमार देशमुख यांना 96,529 मतं मिळाली होती. तर, वंचित बहुजन आघाडीच्या आनंद चंदनशिवे यांना 23,461 मतं मिळाली होती. येथे राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे हे तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 19,205 मतं मिळाली होती. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजप महायुतीच्या विजयकुमार देशमुख यांचं पारडं जड मानलं जातं. याशिवाय ते जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील राहिले आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपा महायुतीकडून राम सातपुते यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. तर, काँग्रेस महाविकास आघाडीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या व तत्कालीन विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट दिले होते. त्यामुळे, येथील मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवत आईच्या पराभवाचा वचपा काढला. गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येथे भाजपचे जयसिद्धश्वेर स्वामी हे खासदार बनले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली. लोकसभेच्या 6 पैकी 4 मतदारसंघात प्रणिती शिंदेना 74,197 मताधिक्य मिळालं होतं. त्यापैकी, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राम सातपुते यांना मताधिक्य आहेत. राम सातपुते यांना तब्बल 35,000 मतांचं मताधिक्य येथे आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातून भाजप महायुतीचं पारडं जड दिसून येते.
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
अधिक पाहा..