पंचांग -
रविवार : कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.१४, चंद्रास्त सकाळी ७.१८, भारतीय सौर कार्तिक २६ शके १९४६.
दिनविशेष -
१९९९ - सातत्याने कामगिरी करणारा शैलीदार फलंदाज राहुल द्रविड १९९८-९९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या कॅस्ट्रॉल पुरस्काराचा मानकरी ठरला.
२०१० - भारताच्या संध्याराणी देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘वुशू’ (चिनी मार्शल आर्ट्स) या क्रीडा प्रकारात ६० किलो गटात रौप्यपदक पटकाविले.
२०११ - वेस्ट इंडिजविरुद्धच्या सलग दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व राखत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.