मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीने (Mahayuti) जोरदार प्रचार केला आहे. प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP) वापर करते आणि फेकून देते, असे वक्तव्य केले होते. आता यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, वापरलं आणि फेकलं कोणी? युज आणि थ्रो कोणी केला? या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबत शिवसेना वाढवण्यासाठी अनेक नेत्यांनी काम केले. शिवसेना मोठी केली. बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या मागे उभे राहण्याचे काम केले. तुम्ही काय केले? कार्यकर्त्यांना तुम्ही तोडलं. आमदार, खासदार, नेते हे आमच्यासोबत का येत आहेत याचे कारण म्हणजे कार्यकर्त्यांना जपण्याचे काम बाळासाहेब करायचे. ते उद्धव ठाकरेंनी केले नाही. राज्यात जे काही सत्तांतर झाले त्याचे मुख्य कारण हे आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हटले की, माझी बॅग तपासली त्याचा व्हिडीओ केला, तर सगळे माझी तपासा म्हणत आहेत. ज्यांच्यासोबत आम्ही गेलो, त्यांची वापरा आणि फेकून द्या अशी निती आहे. त्यामुळेच, त्यांनी काही मिंद्यांनी एप्रोच केला. पण, जिवाला जीव देणाऱ्यांनी मला साथ दिली, असे म्हणत शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडावरही ठाकरेंनी भाष्य केलं. तसेच, पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. शिवसेना हे माझ्या आजोबांनी नाव ठेवलं आहे. आयोगाचा निकाल मी मानूच शकत नाही, अशा शब्दात निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला. तर, मर्दाची अवलाद असेल तर त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवावी, असेही आव्हान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या