पुढे बोलतांना आ.गायकवाड म्हणाले की, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत अनेक आमदार झाले, परंतू विकास किती जणांनी केला ? असा प्रश्न उपस्थित करीत पुर्वीच्या आमदारांनी मुस्लीम समाजाला शादीखाना दिला असेल तर त्यासाठी किती निधी दिला, समाजाचा कोणता विकास केला, त्यांनी मुस्लीम समाजाला काय दिले याचा विचारकरणे गरजेचे आहे. त्यांच्या कामाची तुलना माझ्या कामाशी करुन बघा व नंतर मला सांगा मी तुमच्या विश्वासाचा हक्कदार आहे की नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित गर्दीला केला.त्याआधी गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीवर फुलांचा वर्षाव करत ठिकठिकाणी आ. गायकवाड यांचे माता-भगिणींनी औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत केले. या रॅलीला जनसमर्थकांनी अभुतपूर्व अशी गर्दी केली. मुस्लीम बहुलवस्तीत विकास व्हावा यासाठी मी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. अनेक ठिकाणी शादी खाने बनवले. मागील आमदारांची तुलना करा व बघा त्यांनी १५ते २० लाखापेक्षा जास्त निधी दिला नाही. या शादीखान्याासाठी मी कोट्यवधीचा निधी दिला. अनेक कब्रस्तानाचा विकास केला असल्याचे संजय गायकवाड यावेळी म्हणाले.