Gold Price: सोन्याचे दर गडगडले; दुबई, सिंगापूर, ओमानपेक्षाही स्वस्तात मिळतेय भारतात सोने, जाणून घ्या दर
Times Now Marathi November 17, 2024 05:45 PM

Gold Rate: उच्चांकी दर गाठलेल्या झाली आहे. ही घसरण इतकी झाली आहे की, आता UAE, कतार, ओमान आणि सिंगापूर यासारख्या देशांपेक्षाही भारतात सोने स्व्सतात मिळत आहेत. हे सर्व देश सोने खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत. 16 नोव्हेंबर रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 110 रुपयांनी घसरुन 75,650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 22 कॅरेट सोन्याचा दर 69,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 18 कॅरेट सोन्याचा दर 56,740 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. तर त्याचवेळी ओमानमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 220 रुपयांनी वाढून 75,763 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तकारमध्ये 76293 रुपये प्रति 10 ग्रॅम तर यूएईमध्ये 76170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

सोन्याचा ट्रेंड बदलण्याचे कारण काय?
सोन्याच्या किमतीत झालेली ही घसरण मध्यपूर्वेतील देशांमधील सोन्याच्या किमतीच्या वाढीच्या उलट आहेत. तेथील सोन्यामध्ये वाढ हे भौगोलिक राजकीय तणाव, विशेषत: इस्रायल आणि गाझाभोवती आणि प्रादेशिक अस्थिरतेमुळे होते. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. भारतातील वाढत्या मागणीमुळे किमतीतील तफावत आणखी वाढली आहे. या आठवड्यात सोन्यावरील प्रीमियम 16 डॉलर प्रति औंसपर्यंत वाढला. गेल्या आठवड्यात प्रीमियम केवळ 3 डॉलर इतका होता.

हे पण वाचा :

सर्वात मोठी साप्ताहिक घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत तीन वर्षांहून अधिक काळातील दिसून आली. अमेरिकेत स्पॉट किमती 4.5 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सोने प्रति ट्रॉय औंस सुमारे 2,563.25 डॉलर्स या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सुद्धा दर कपातीबाबत सावध पवित्रा घेतला आहे.

केंद्रीय बँकांकडून होणारी सोने खरेदी आणि सततच्या भू-राजकीय तणावामुळे अलिकडे सोन्यात 24 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. सप्टेंबर महिन्यात भारतातील सोन्याचा दर 75000 रुपयांवर होता पण आता या पातळीखाली सोन्याचे दर घसरले आहेत. आता फेडच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.