समीर भुजबळांसाठी सुनील शेट्टी मैदानात, खास मित्रासाठी व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
जयदीप मेढे November 18, 2024 07:13 PM

Suniel Shetty on Sameer Bhujbal : नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgoan Assembly Constituency) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. समीर भुजबळ यांच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये बरंच घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. पण समीर भुजबळ हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच. प्रचाराच्या तोफा अवघ्या काही तासांमध्ये थंडावणार आहेत. त्याआधी समीर भुजबळ त्यांच्या मतदारसंघात त्यांची सर्वोतोपरि ताकद लावत असल्याचं चित्र आहे. इतकच नव्हे तर आता अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यानेही समीर भुजबळ यांच्यासाठी खास व्हिडीओ करत त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 

सुनील शेट्टीने समीर भुजबळांविषयी भाष्य करत मी जर त्या मतदारसंघात राहत असतो तर समीर भुजबळांनाच मत दिलं असतं, असं म्हटलंय. सध्या सुनील शेट्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. त्याचप्रमाणे समीर भुजबळांनी नाशिककरांसाठी केलेल्या विकास कामाचाही पाढा या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टीने वाचून काढला आहे. 

सुनील शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल

सुनील शेट्टीने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडीओ करत म्हटलं की, नमस्कार आज मी माझा मित्र समीर भुजबळांविषयी काहीतरी सांगू इच्छितो. एक उत्तम व्यक्तीमत्त्व, ध्येयवादी व्यक्ती आणि खूप खास मित्र.. जेव्हाही त्यांची भेट होते,तेव्हा कायमच ते विकास, नवे प्रकल्प आणि भविष्यातील कामांविषयीच ते बोलतात.नाशिकमधले अनेक मोठे प्रकल्प हे त्यांच्याच प्रयत्नांच यश आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसोबत आपलं जोडलं जाणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच आपला समाज आणखी चांगला होईल.. त्यामुळे 20 नोव्हेंबरला वोट द्यायला अजिबात विसरु नका.. मी जर त्या भागात राहत असतो तर मी माझं मत समीरलाच दिलं असतं. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भयमुक्त नांदगाव अशी टॅगलाईन घेऊन निवडणूक लढवत असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली. यानंतर समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. समीर भुजबळ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीच्या नेत्यांकडून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. मात्र समीर भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sameer Bhujbal (@sameerbhujbal09)

ही बातमी वाचा : 

कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा अपघात, रक्ताळलेल्या कपड्यांचा फोटो सोशल मीडियावर टाकत म्हणाली..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.