आयपीएल लिलावात या विदेशी खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली! जाणून घ्या 5 खेळाडूंबाबत
GH News November 18, 2024 07:15 PM

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये मेगा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबरला पार पडणार आहे. एकूण 574 खेळाडू रिंगणात असून यापैकी काही खेळाडू भाव खाऊन जातील यात शंका नाही. भारताकडून ऋषभ पंत हे सर्वात चर्चेत असलेलं नाव आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिलीज केल्यानंतर सध्या इतर फ्रेंचायझींच्या त्याच्यावर नजर आहे. त्यामुळे ऋषभ पंतला जास्तीत जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे. इतकंच तर दिल्ली कॅपिटल्सलाही आरटीएम कार्ड वापरता येणार नाही. दरम्यान, ऋषभ पंतव्यतिरिक्त पाच विदेशी खेळाडूंची चर्चा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर हे पाचही खेळाडू फॉर्मात आहेत. त्यामुळे त्यांना संघात घेण्यासाठी लिलावात चढाओढ दिसून येईल. यात काही अष्टपैलू आणि काही आक्रमक फलंदाज आहेत. आयपीएलमध्ये एका षटकात दोन बाउंसरची परवानगी अजूनही कायम असल्याने वेगवान गोलंदाजांचा भाव वधारलेला असेल यात शंका नाही.

या पाच विदेशी खेळाडूंना मिळू शकते कोट्यवधींची रक्कम

स्पेन्सर जॉन्सन: हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज 15 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2025 लिलावासाठी निवडलेल्या अंतिम यादीत आहे. नुकतंच पाकिस्तानविरुद्ध टी20 मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. स्पेन्सर जॉन्सनने पाकिस्तानविरुद्ध मायदेशात सुरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 26 धावांत 5 बळी घेतले. या खेळीने त्याने फ्रेंचायझी मालकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मागच्या पर्वात जॉन्सन गुजरातसोबत 10 कोटी रकमेसह होता. पण त्याला फ्रेंचायझीने रिलीज केलं आहे.

जेकेब बेथेल : इंग्लंडचा 21 वर्षीय अष्टपैलू खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. नुकत्याच खेळलेल्या शेवटच्या चार डावात त्याने दोन अर्धशतकं झळकावली. जेकेबची निवडही आयपीएल लिलावाच्या अंतिम यादीत झाली आहे. नुकतंच वेस्ट इंडिजविरुद्ध 32 चेंडूत नाबाद 62 खेळी केली होती. त्याचा स्ट्राईक रेट 142 च्या वर आहे. जेकेब बेथेलने बेस प्राईस 1.25 कोटी ठेवली आहे.

फिल सॉल्ट : फिल सॉल्ट हा इंग्लंडचा सलामीवीर आहे. सुरुवातीलाच आक्रमक फलंदाजी करून समोरच्या संघाचं कंबरडं मोडण्याची ताकद आहे. टी20 मध्ये त्याचा स्ट्राईक रेट आहे. मागच्या चार टी20 सामन्यात त्याने एक शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे.

एविन लुईस : वेस्ट इंडिजचा सलामीवीर एविन लुईसही चर्चेत आहे. त्याचा फॉर्म पाहता संघात घेण्यासाठी फ्रेंचायझींची चढाओढ लागू शकते. इंग्लंडविरुद्ध त्याने 219.35 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. 31 चेंडूत 68 ही त्याची मागच्या सामन्यातील सर्वोत्तम खेळी आहे.

शाई होप : आयपीएल 2025 लिलावात शाई होपचंही नाव आहे. शाई होपनेही 24 चेंडूत 68 धावा करून चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळे लिलावात फ्रेंचायझींची त्याच्यावरही नजर असणार यात शंका नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.