चांदुररेल्वे : धामणगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहिण अर्चना रोठे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सातेफळ फाट्यावर हल्ला केल्याची घटना (ता.१८) रात्री नऊच्या सुमारास घडली. या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
आज सोमवारी भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे या मतदारसंघात प्रचार करून परत येत असताना सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याचे समजते.
यात रोठे यांचा हाताला गंभीर दुखापत झाली. त्याच्या एमएच २७ डीबी ५००१ क्रमांकाच्या गाडीची समोरील काच फोडण्याचाही प्रयत्न या हल्ल्यात झाला. हल्लेखोर अंधारात पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर त्यांना डॉ. ढोले यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती पाठविण्यात आले. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी चांदुर पोलिस स्थानकात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.