Weather Update: शेकोट्या पेटणार, गुरुवारपासून राज्यात तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा
Saam TV November 19, 2024 02:45 PM

सध्या देशभरात हिवाळा सुरु झाला आहे. हळूहळू थंडी वाढत चालली आहे. महाराष्ट्रातदेखील थंडी पडताना दिसत आहे. सध्या पावसाळी वातावरण निवळले असून उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहेत. राज्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे. (Weather Update)

सध्या महाराष्ट्रात थंडी वाढू लागली आहे. किमान तापमान हे ११ अंशापर्यंत घसरले आहे. आजपासून या तापमानात अजून घट होणार आहे. राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याने गारठा वाढवण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाब अंदाज वर्तवला आहे. (Weather Update Today)

सध्या कोमेरिन भार आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरु झाला आहे. उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे. तर दिल्लीला निचांकी १०.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

धुळे येथे कृषीत राज्यातील निचांकी ११ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानात घट होत आहे.

आणि राज्याच्या दक्षिण भाग वगळता उरलेल्या राज्यात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. मुंबईतील सांताक्रुझ आणि रत्नागिरी येथे ३५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानात घट होणार आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढणार असल्याचे अंदाज वर्तवला आहे.

राज्यात २१ नोव्हेंबर पासून थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारपासून राज्यात थंडी वाढणार, हवामान शास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निवळताच उत्तर भारतात पश्चिमी चक्रावत सक्रिय झाले आहे.या भागातून महाराष्ट्रात शीतलहरी येण्यास प्रारंभ झाला आहे. काल अहिल्यानगरचा पारा १२.६ अंश इतका होता तर पुण्यात किमान १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

राज्यातील तापमान

पुणे ३१.२, अहिल्यानगर ३१, धुळे (११), ३२.८,कोल्हापूर ३०.३, महाबळेश्वर २४.५, नाशिक ३१.३, निफाड ३०.४, सांगली ३१.९, सातारा ३०.७, सोलापूर ३४.४, सांतक्रुझ ३५.८, डहाणू ३४.३, रत्नागिरी ३५.८, छत्रपती संभाजी नगर ३१,८.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.