Deepika Padukone Depression Joke : स्टँड अप कॉमेडीयन समय रैना सध्या त्याचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे प्रचंड चर्चेत आहे. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोचा लेटेस्ट दहावा एपिसोड रिलीज झाला आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' सध्या यूट्यूबवर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या शोमधील क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही प्रेक्षकांकडून याचं कौतुक केलं जात आहे, तर काही प्रेक्षकांकडून या शोवर टीका करण्यात येत आहे. या शोमध्ये दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनची खिल्ली उडवण्यात आली आणि यावर न्यूरोलॉजिस्टसह इतर परीक्षक हसत होते. यावर आता नेटकऱ्यांनी कडक शब्दात संताप व्यक्त केला आहे.
समय रैनाचा कॉमेडी शो 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या दहाव्या एपिसोडमध्ये बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनची खिल्ली उडवण्यात आली. एका कॉमेडियनचे दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनची चेष्टा करत जोक केला. यावर कॉमेडियन समय रैना, अभिनेता रघु राम, कॉमेडियन तन्मय भट्ट, न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिड वॉरियर आणि बलराज सिंह घई हे सर्व जज जोरजोरात हसू लागले. ही चेष्टा-मस्करी इथे उपस्थित लोकांच्या पसंतीस पडली असली, तरी नेटीझन्सने यावर कडक शब्दात टीका करण्यात आली आहे.
स्टँड अप कॉमेडीयन बंटी बनर्जी नावाच्या महिलेने 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये भाग घेतला होता. स्टँड अप कॉमेडी करताना बंटी बनर्जीने दीपिका पदुकोणच्या मुद्द्याचा आधार घेतला. तिने यावेळी सांगितलं की, गेल्या दोन वर्षात तिला पुरेशी झोप मिळालेली नाही, कारण तिला तिच्या मुलाच्या संगोपनासाठी वेळ द्यावा लागला. यावेळी तिने दीपिका पादुकोणचा उल्लेख केला.
त्यानंतर तिने नुकतीच आई झालेल्या दीपिका पदुकोणच्या नैराश्याचा उल्लेख केला. यावेळी बंटी म्हणाली, 'दीपिका पदुकोणही नुकतीच आई झाली आहे ना? मस्त. आता तिला माहित पडेल की, खरं डिप्रेशन काय असतं.' यानंतर बंटी बॅनर्जीच्या बोलण्यावर पॅनेलमधील न्यूरोलॉजिस्टसह उपस्थितांमध्ये हशा पिकला. दरम्यान, हा विनोद असंवेदनशील असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी शो आणि त्यामधील सहभागी लोकांवर टीकेची झोड उठवली आहे
कॉमेडियन बंटी बनर्जीने उपहासात्मकपणे म्हटलं की, ती ब्रेकअपमुळे आलेल्या नैराश्याची चेष्टा करत नव्हती. पुढे ती म्हणाली, 'डिप्रेशन म्हणजे जेव्हा तुमची झोप उडते आणि तुमचे मूल रात्री 3 वाजता उठतं आणि त्याला खेळायचं असतं'. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. एका महिलेने कमेंट करत लिहिलं आहे की, 'या फ्रेममध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाला स्वतःची लाज वाटली पाहिजे. नैराश्याची अशी कोणतीही श्रेणी नाही. अशा शोमधील लोकांच्या सहभागामुळे हा मूर्खपणा दिवसेंदिवस वाढत आहे. ही लज्जास्पद बाब, प्रत्येकाला ते मजेशीर वाटतेय.
कॉमेडी शोच्या या व्हायरल क्लिपवर नेटकरी कमेंट करत तिखट प्रतिक्रिया देत आहेत . एका यूजरने लिहिलंय, 'हे खूप वाईट आहे. नैराश्यामुळे लोक जीव गमावतात. एखाद्याने खोटी कथा रचली आहे, असं तुम्हाला वाटतं म्हणून हसणं, हे दाखवतं की, तुम्ही किती असंवेदनशील आणि अशिक्षित आहात. तुम्हाला इंग्रजी येत असलं तरी तुम्ही कोणाच्या मानसिक समस्येबद्दल सहानुभूती दाखवू शकत नाही, तर तुम्ही नेहमीच अशिक्षित मूर्ख राहाल.' तिसऱ्या यूजरने लिहिले, 'संपूर्ण पॅनेलला लाज वाटली पाहिजे. हs लज्जास्पद आहे, कारण पॅनेलमधील एक प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिड वॉरियर आहे.
Woman on India's Got Latent making fun of Deepika’s depression
byu/Even_Conversation_83 inBollyBlindsNGossip