युगेंद्र पवारांनी पैसे वाटल्याची तक्रार, निवडणूक आयोगाचं सर्च ऑपरेशन, नेमकं काय सापडलं?
Marathi November 19, 2024 04:24 PM

बारामती विधानसभा निवडणूक 2024: विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तोफा कालच थंडावल्या आहे. विधानसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. अशातच .  युगेंद्र पावरांच्या शरयू मोटर्स (Sharyu Motors office) या ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. माहिती मिळाल्यानंतर लगेच, निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले होते. यावेळी त्यांना काहीही आढळून आले नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले.

बारामती शहरापासून जवळस असलेलं शरयू मोटार्स आहे. या ठिकाणी पैसाचं वाटप चालु असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले असता त्यांना काहीच आढळून आलं नाही. याबाबत एबीपी माझाशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, रात्री साडेदहा वाजता 10 ते 12 अधिकारी आले होते. त्यांनी सगळे सर्च ऑपरेशन केलं. त्यांना इथं काहीही मिळालं नाही. त्यांना आण्ही सहकार्य केल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. याबाबत मला काहीही माहित नाही. तक्रार कोणी दिली हे आम्ही विचारले पण त्यांनी काहीच माहिती दिली नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. जोपर्यंत काही फॅक्ट्स समोर येत नाहीत, त्यामुळं त्याबाबत बोलणंयोग्य होणार नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. होणाऱ्या सगळ्या चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार असल्याचे युग्रेंद्र पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Baramati Assembly constituency: बारामतीत पुन्हा पवार विरूध्द पवार! दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला, अजितदादांना पुतण्या युगेंद्र देणार टफ फाईट

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.