हातात त्रिशूल आणि रक्तानं माखलेला ऋषभ शेट्टी; अंगावर शहारे आणणारा 'कांतारा 2'चा धमाकेदार टीझर रिलीज
नामदेव जगताप November 19, 2024 04:43 PM

Kantara 2 Teaser Release: ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) बहुचर्चित चित्रपट 'कांतारा' 2022 मध्ये रिलीज करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, तो ब्लॉकबस्टरही ठरला. आता चाहते कांताराच्या सीक्वेलची (Kantara 2) आतुरतेनं वाट पाहात आहेत. कातांरा सुपरडुपर हिट ठरल्यानंतर ऋषभ शेट्टीने 'कांतारा 2'ची घोषणा केली होती. तेव्हापासूनच चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत होते. अलिकडेच ऋषभ शेट्टीनं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर काही तासांनी चित्रपटाचा धमाकेदार टीझरही प्रदर्शित करण्यात आला. 

'कांतारा 2' चा अप्रतिम टीझर रिलीज

'कांतारा 2' च्या टीझरमध्ये 2022 च्या ब्लॉकबस्टर 'कांतारा' च्या प्रीक्वेलच्या जगाची झलक पाहायला मिळते. याला 'कंतारा: अध्याय 1 - ए लीजेंड' असं शीर्षक देण्यात आलं आहे. हा टीझर 82 सेकंदांचा आहे आणि "तो क्षण आलाय..." या शब्दांनी टीझरची सुरुवात होते, त्यानंतर काळ्या पडद्यावर काहीतरी जळतं आणि नंतर टॉर्चसह जंगलातून बाहेर फिरत असलेल्या शिवा (ऋषभ शेट्टी) मशाल घेऊन जंगलातून जाताना दिसत आहे. 

जसा शिवा आगीनं घेरला जातो, एक आवाज ऐकू येतो... "प्रकाश! प्रकाश में सब कुछ दिखाई देता है! लेकिन यह प्रकाश नहीं है! यह एक दर्शन है! एक दृष्टि जो हमें दिखाती है कि कल क्या था, क्या है और क्या होगा! क्या तुम नहीं देख सकते?" अंधारात शिवाचा चेहरा स्पष्टपणे दिसतो. यावेळची कथा कदंब राजवटीची असेल हेदेखील टीझरवरुन स्पष्ट झालं आहे."

पाहा टीझर : 

'कांतारा 2'च्या टीझरमधून ऋषभ शेटटीच्या खुंखार लूकची झलक 

जसा पौर्णिमेचा चंद्र एका गुहेच्या वर जातो, तसा त्रिशूल हातात घेतलेला रक्तानं माखलेली एक व्यक्ती दिसून येते. गळ्यात रुद्राक्ष आणि लांब केसांसह ऋषभ शेट्टीचा खुंखार लूक दिसतो. ऋषभचा लूक पाहून अंगावर शहारे येतात. 

कधी रिलीज होणार 'कांतारा 2'?

सुपरडुपर हिट झालेला 'कांतारा'ची पटकथा ऋषभ शेट्टीनं लिहिलं होती आणि दिग्दर्शनही ऋषभ शेट्टीनं केलं होतं. 2022 मध्ये आलेल्या या फिल्मनं त्यांना बेस्ट अॅक्टर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार दिला होता. तसेच, कांतारा चॅप्टर 1 - ए लीजेंडची रिलीज डेटही आली आहे. दरम्यान, हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मोठ्या पडद्यावर रिलीज करण्यात आली होती. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.