यावेळी बोलताना डॉ.शशिकांत खेडेकर म्हणाले की,इथल्या विद्यमान आमदारांनी मतदारसंघाची वाट लावण्याचे काम केले. २५ वर्षांत त्यांना साधे साधे प्रश्नही सोडविता आले नाही. सिंदखेड राजा सारखे जागतिक दर्जाचे प्रेरणास्थळ असताना देखील या माणसाला काही करता आले नाही.आमदार झाला की हा माणूस गायब होतो, डायरेक्ट निवडणुका आल्या तेव्हाच मतदारसंघात येतो. याउलट जनतेने ५ वर्षे संधी दिली तेव्हा २३०० कोटी रुपयांची विकासकामे मतदारसंघात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून देऊळगाव राजा सिंदखेड राजा शहराच्या पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी आणला, त्यातील शेकडो कोटींची कामे आता प्रगतीपथावर आहेत. मतदारसंघातील जनतेला आता विद्यमान आमदारांचा कावा लक्षात आलेला आहे, त्यामुळे यावेळी त्यांचा सडकून पराभव होणार आहे. यावेळी सिंदखेडराजा मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकणार आहेच असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला...