Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : पैसे वाटल्यावरुन विरारमध्ये राडा; विनोद तावडेंना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरलं... 15 कोटी आणले?
Sarkarnama November 20, 2024 03:45 AM
Assembly Elections 2024 LIVE updates : विरारमध्ये पैसे वाटल्यावरुन राडा, बविआ-भाजप कार्यकर्तेमध्ये हाणामारी

विरारमध्ये मतदारांना भाजपने पैसे वाटल्याचा आरोप करीत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांना घेरलं आहे. तावडेंने पैसे वाटल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तावडे यांनी 15 कोटी रुपये वाटण्यासाठी आणले होते,असा आरोप हितेंद्र ठाकुर यांनी केला आहे. विरारच्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून बविआ आणि भाजप कार्यकर्तेमध्ये हाणामारी झाली. आमदार क्षितिज ठाकुर हॉटेलमध्ये पोहचले आहेत. दोन तासांपासून तावडे आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु आहे.

Uddhav Thackeray LIVE News : उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे तुळजापूरकडे रवाना!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तुळजापूरकडे रवाना झाले आहेत. प्रचार तोफा थंडावल्यानंतर उद्धव ठाकरे सपत्नीक तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत.

Baramati Assembly Constituency LIVE News : श्रीनिवास पवारांच्या मालकीच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन

बारामतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू मोटर्समध्ये रात्री पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी एक दिवस हे सर्च ऑपरेशन केल्यामुळे बारामतीमधील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हे बारामतीत उमेदवार आहेत. तर श्रीनिवास पवार हे युगेंद्र यांचे वडील आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : आमगाव पोलिसांची मोठी कारवाई 12 लाखांची अवैध दारु जप्त

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी एक दिवस उरला असतानाच आमगाव पोलिसांनी दोन वाहनांसह जवळपास 12 लाख 76 हजार 870 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कट्टीपार येथे नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली आहे.

Sanjay Shirsat meets Manoj Jarange Patil LIVE News : शिंदेंचे नेते जरांगे पाटलांच्या भेटीला

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी ही भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Kasba Assembly Constituency LIVE News : कमल व्यवहारे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्याची चर्चा

कसबा विधानसभा मतदारसंघात मतदानाला अवगा एक दिवस उरला असताना मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असणारे बॅनर झळकले आहेत. 'कसब्यात मराठा उमेदवार ओळखा, एक मराठा लाख मराठा'च्या घोषणेसह जरांगे पाटलांचा फोटो असणारे हे बॅनर अनेक चौकांमध्ये लावण्यात आले आहेत.

कसब्यात प्रमुख लढत असणारे काँग्रेस, भाजप, मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार हे ओबीसी असून अपक्ष लढणाऱ्या कमल व्यवहारे या एकमेव मराठा समाजातील आहेत. त्यामुळे व्यवहारे यांच्या समर्थनार्थ हे बॅनर लावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना लागलेल्या या बॅनर्समुळे मात्र राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

Anil Deshmukh Attack LIVE News : अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

काटोलमध्ये माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये देशमुख यांना गंभीर दुखापत झाली आहे. अखेर या प्रकरणी 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्यावर सध्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू.

Javed Akhtar And RSS LIVE News : RSS संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका झाली आहे. 2021 मध्ये एका वकिलाने मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीतून अख्तर यांना दिलासा मिळाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar LIVE News : 2 कोटींची रक्कम शिरसाट यांच्या फोननंतर सोडली, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली असून पोलिसांनी 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

Rahul Gandhi LIVE News : राहुल गांधींनी 2 डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना 2 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुणे सत्र न्यायलयाने दिला आहे. लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता.

Ulhasnagar LIVE News : ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या गाडीवर हल्ला

कल्याण पूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला आणि दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री हा हल्ला करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार बोडारे यांची मुलगी देखील यावेळी गाडीत उपस्थित होती.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.