भारतीय संघाचा स्टार खेळाडू तिलक वर्मा आयसीसीने जाहीर केलेल्या नवीनतम क्रमवारीत चर्चेत आला आहे. एका झटक्यात तिलक वर्माने मोठ्या-मोठ्या दिग्गजांना मागे टाकले आहे. त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवलाही मागे सोडत पुढे गेला आहे. शिवाय आयसीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही मोठा फायदा झाला आहे. मात्र सूर्यकुमार यादवला फटका बसला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन टी20 क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. मात्र, ट्रॅव्हिस हेडचे अव्वल स्थान अजूनही अबाधित आहे. ट्रॅव्हिस हेड क्रमवारीत 855 च्या रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. ज्याचे रेटिंग सध्या 828 वर आहे.
तिलक वर्माने सर्वात मोठा पराक्रम केला आहे. त्याने एका फटक्यात 69 क्रमांकानी जबरदस्त उडी मारली आहे. तो आता सूर्यकुमार यादवला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता 806 पर्यंत वाढले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला दोन बॅक टू बॅक शतके झळकावण्यात यश आले. याचा थेट फायदा त्याला होताना दिसत आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवचे किरकोळ नुकसान झाले असून तो चौथ्या स्थानावर घसरला आहे.
भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्यालादेखील आयसीसी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. त्याने आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. हार्दिक पांड्याचा टाॅप-10 मध्ये केवळ एकटा भारतीय म्हणून सामवेश आहे.
हेही वाचा-
आयसीसी क्रमवारीत तिलक वर्माची गरुड झेप; हार्दिक पांड्याला देखील बंपर फायदा
IND vs AUS: प्रशिक्षक माॅर्नी मॉर्केलचा याॅर्कर? पर्थ कसोटीत शुबमन गिलची सरप्राईज एंट्री होणार!
पर्थ कसोटीत जडेजा किंवा सुंदरला नाही, तर या फिरकीपटूला मिळणार संधी, पाहा नेमकं कारण