जिल्ह्याची सरासरी टक्केवारी – 54.69
सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आल्याचे दिसून आले. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळाने निवडणूक आयोगाने पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी बसमध्ये थांबविलेल्या मतदारांची चौकशी व बॅग तपासणी केली. निवडणूक आयोगाच्या बसमधील चौकशीत मतदार हे स्थानिक ढेकू गावचे असल्याचे सिध्द झाले. आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आम्हाला वेठीस धरले जात असल्याचा मतदारांनी आरोप केला. अडविलेल्या मतदारांमध्ये एक गरोदर महिला देखील असल्याचे समजते. निवडणूक आयोगाने चौकशी केल्यानंतर मतदारांना मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले.