मुंबई : राज्यातील 288 मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी घेण्यात आलेल्या मतदानानंतर आता एक्झिट पोलचे (Exit Poll) आकडे समोर आले आहेत. विविध सर्वेक्षण संस्थांच्या सर्व्हेतून आलेली आकडेवारी वेगवेगळी आहे. मात्र, महाविकास आघाडी व महायुती यांच्यात काँटे की टक्कर होत असून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हेही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. चाणक्या स्ट्रॅटेजी, इलेक्ट्रोल एज, पोल डायरी आणि मॅट्रीझ या चार संस्थांकडून मतदानानंतरचे एक्झिट पोल अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, भाजपला (BjP) सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. त्यामध्ये, भाजपला जास्तीत जास्त 108 आणि कमीत कमी 77 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, 4 पैकी तीन संस्थांकडून तीन संस्थांकडून महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज असून एका संस्थेनेच महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा येतील असा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधानसभा निवडणूक एक्झिट पोल अंदाज समोर आले आहेत. त्यामध्ये, महायुतीचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. मात्र, ELECTORAL EDGE या सर्वेक्षण संस्थेकडून महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला 150 जागांवर यश मिळू शकते, तर 20 जागा इतर पक्ष व अपक्षांच्या पारड्यात जाऊ शकतात. तीन संस्थांकडून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येते. त्यानुसार, महायुतीला 152 ते 160 जागांवर भाजपा महायुतीला यश मिळण्याची शक्यता आहे. या सर्वच सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामध्ये, महाविकास आघाडीची सत्ता दर्शवणाऱ्या ELECTORAL EDGE च्या सर्वेक्षणानुसार भाजपचं सर्वाधिक 78 जागा जिंकेल असा अंदाज आहे. त्यामुळे, राज्यात भाजपने 148 जागांवर निवडणूक लढवली असता, 78 ते 108 जागांवर भाजपला यश मिळू शकते. मात्र, गत 2019 च्या निवडणुकीत भाजपला 105 जागांवर यश मिळालं होतं. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता असून त्यांच्या जागा घटणार असल्याचं सर्वेक्षणातून दिसून येत आहे.
Chanakya strategy - 90
पोल डायरी - 77-108
ELECTORAL EDGE
मतदानानंतर आलेल्या या सर्वेक्षण संस्थांच्या अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक 108 पर्यंत जागा मिळू शकतात. तर, भाजपला सर्वात कमी 78 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे, गत 2019 च्या निवडणुकीपेक्षा भाजपला यंदाच्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.
महायुती = 152 ते 160
मविआ = 130 ते 138
-----------------------------
महायुती - 46 टक्के
भाजप - 90+
शिवसेना शिंदे - 48+
अजित पवार - 22+
-----------------------------
मविआ - 41 टक्के
काँग्रेस - 63+
शिवसेना ठाकरे -35+
शरद पवार - 40+
-----------------------------
महायुती - 122-186
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर - 12-29
महायुती 150-170
मविआ 110-130
इतर 8-10
महायुती
भाजप 78
शिवसेना 26
एनसीपी-अजित पवार 14
महाविकास आघाडी
काँग्रेस 60
एनसीपी-एसपी-46
शिवसेना-उबाठा 44
इतर 20
--------------------------------------------------