Maharashtra assembly election 2024 Voting news live : छत्रपती संभाजीनगरमध्ये EVM मध्ये बिघाड, सकासकाळी मतदारांचा खोळंबा
Sarkarnama November 20, 2024 10:45 PM
Chhatrapati SambhajiNagar election 2024 Voting live: छत्रपती संभाजीनगरमध्ये EVM मध्ये बिघाड

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ईव्हीएम'मध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मतदानाच्या सुरूवातीलाच मतदारांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Chandrakant Patil Live News : विधानसभेला लोकं अजितदादानांचं साथ देतील - चंद्रकांत पाटील

लोकसभेला पवार साहेबांची मुलगी होती म्हणून त्यांना जास्त वेटेज दिलं. मात्र आता विधानसभेला लोकं आता अजित पवारांना साथ देतील ते मतदारसंघातील लोकांना नावाने ओळखतात, असा विश्वास कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Kasba Assembly Election 2024 Voting live : अभिनेता सुबोध भावे मतदान केंद्रावर हजर

अभिनेता सुबोध भावे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कसबा पेठेतील गुजराती प्रायमरी शाळेतील मतदान केंद्रावर हजर झाला आहे. तो कसबा मतदारसंघाठी मतदान करणार आहे.

Pune Assembly Election 2024 Voting live : पुणेकरांचा नादच खुळा! सकाळी 6 वाजताच मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिकांची हजेरी

मॉर्निंग वॉकसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक सकाळी 6 वाजताच मतदान केंद्रावर हजर. मतदान सुरू होण्याआधीच पुण्यातील मॉर्निंग वॉकसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्राबाहेर दाखल झाले होते. त्यामुळे पुणेकर आपल्या मतदानाच्या हक्काबाबत जागरूक असल्याचं दिसून आलं आहे.

Nagpur Assembly Election 2024 Voting live : मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.

Baramati Assembly Election 2024 Voting live : अजित पवार, सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दोघांनी पहाटेच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अजितदादांनी आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

Maharashtra Vidhan Sabha election 2024 Voting live : विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत असून महायुती, महाविकास आघाडीसह राज्यातील इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य एव्हीएममध्ये बंद होणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.