Maharashtra Exit Polls Result 2024 : महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडले. निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राबाबत 10 एक्झिट पोल आले आहेत. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती पुन्हा एकदा पुनरागमन करताना दिसत आहे. MATRIZE च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150 ते 170 जागा, MVA ला 110 ते 130 जागा मिळताना दिसत आहेत. याशिवाय चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या सर्वेक्षणात महायुतीला 152-160 जागा आणि एमव्हीएला 130-138 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोल डायरीने महायुती 122-186 जागा आणि MVA 69-121 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि PMARQ ने महायुती 137-157 आणि MV 126-146 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. अशा प्रकारे जनमत चाचणीत महायुतीला 150 आणि एमपीएला 126 जागा मिळू शकतात.
दरम्यान, बहुतांश पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये निकराची झुंज आहे. त्यामुळे अपक्षांचा भाव वधारण्याची शक्यता आहे. यामध्ये लोकशाही मराठी रुद्र 18 ते 23, दैनिक भास्कर 20 ते 25 आणि पोल डायरी 12 ते 29 जागा अपक्षांकडे जातील, असा अंदाज वर्तवला आहे. राज्यात परिवर्तन महाशक्ती, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी स्वबळावर आहेत. त्यामुळे दोन आघाडी बहुमतापर्यंत न गेल्यास अपक्ष निर्णायक ठरू शकतात.
ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल हे निवडणूक सर्वेक्षण आहेत. निवडणुकीपूर्वी जनमत चाचणी घेतली जाते. त्याचे निकालही निवडणुकीपूर्वी जाहीर होतात. यामध्ये सर्व लोकांचा समावेश आहे. याचा अर्थ सर्वेक्षणातील प्रश्नांची उत्तरे मतदारानेच दिली पाहिजेत असे नाही. या सर्वेक्षणात विविध मुद्द्यांच्या आधारे जनतेच्या मूडचा अंदाज लावला जातो. निवडणुकीदरम्यान एक्झिट पोल घेण्यात येतात. मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर त्याचे निकाल जाहीर होतात. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर एक्झिट पोल एजन्सीचे अधिकारी उपस्थित असतात. मतदान केल्यानंतर ते मतदारांना निवडणुकीशी संबंधित प्रश्न विचारतात. मतदारांच्या प्रतिसादाच्या आधारे अहवाल तयार केला जातो. मतदारांचा कल कोणत्या दिशेने अधिक आहे, हे शोधण्यासाठी अहवालाचे मूल्यमापन केले जाते. यानंतर निकालांचा अंदाज लावला जातो.
इतर महत्वाच्या बातम्या