Genelia Deshmukh : अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढच्या पाच वर्षांसाठीचा निकाल जाहीर होणार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये राज्यातील राजकारणाचा झालेला चिखल हा यंदाच्या निवडणुकीत मतदारांकडून स्वच्छ केला जाणार का? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. त्याआधी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी अनेकांनी प्रतिक्रिया देताना मतदान करण्याचं आवाहन केलं. पण अभिनेत्री, रितेश देशमुखची पत्नी, काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सून जिनिलिया देशमुखने (Genelia Deshmukh) दिलेल्या प्रतिक्रियेने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. विलाराव देशमुखांच्या नंतरही त्यांची पुढची पिढी ही राजकारणात सक्रिय आहे. त्यांचे दोन सुपुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे काँग्रेस पक्षात आमदार आहेत. इतकच नव्हे तर अमित देशमुख हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. अमित देशमुख हे लातूर शहर आणि धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार आहेत. पण विलासराव देशमुखांच्यानंतर देशमुखांच्याच घरातून महाराष्ट्राला पुढचा मुख्यमंत्री मिळणार का? यावर जिनिलियाने भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा देशमुखांच्या घरातून व्हावा असं तुला वाटतं का? यावर जिनिलियाने म्हटलं की, यावर सध्या आम्ही काहीच बोलू शकत नाही. पण जर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री देशमुख घरातील झाला तर मला खूप जास्त आनंद होईल. आता जनता कुणाला कौल देणार यावर सगळं अवलंबून आहे.
अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे लातूरमधील दोन जागांवरील निवडणुकीच्या रिंगणात आहे. अमित देशमुख हे लातूर शहरातून सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित देशमुख यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तसेच धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता देशमुखांच्या घरातूनच दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार का याची उत्सुकता आहे.
#WATCH | After casting her vote for #MaharashtraAssemblyElections, Actor Genelia D'Souza says "Everyone has the right to cast their votes. People should come out and practice their right. It is an important day today, you can make a big difference..." pic.twitter.com/IU4sEAdAtS
— ANI (@ANI) November 20, 2024