Border Gavaskar Trophy 2024-25: यांच्यातली चौथी कसोटी लढत २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. बिस्बेन कसोटीत भारताचा पराभव पावसामुळे वाचला आणि सामना ड्रॉ राहिला. त्यामुळे तीन सामन्यानंतर मालिका अजूनही १-१ अशी बरोबरीत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी ( WTC Final) भारतीय संघाला उर्वरित दोन्ही कसोटी जिंकाव्या लागणार आहेत. त्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहलीसह आघाडीच्या फलंदाजीचा फॉर्म परत येणे गरजेचा आहे. पण, मेलबर्नवर होणाऱ्या या कसोटीसाठी सराव करताना भारताचा प्रमुख फलंदाज जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
भारतीय संघाने पहिली कसोटी २९५ धावांनी जिंकली, पंरतु दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करताना १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. गॅबावरील कसोटी ऑस्ट्रेलियाने पकड मजबूत केली होती, परंतु पावसामुळे ही कसोटी वाहून गेली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ ५५.८९ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिका ( ६३.३३) अव्वल स्थानावर आहे आणि त्यांना एक विजय फायनलची जागा पक्की करण्यासाठी पुरेसा आहे. ५८.८९ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला उर्वरित ४ कसोटींपैकी ( २ वि. भारत आणि २ वि. श्रीलंका) ३ जिंकाव्या लागतील. त्यासाठी आहे.
अशा या शर्यतीत भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. या मालिकेत ट्रॅव्हिस हेडने आतापर्यंत सर्वाधिक ४०९ धावा केल्या आहेत. त्याला भारताच्या लोकेश राहुल ( KL Rahul) ने कडवी टक्कर दिलीय.. राहुलने २३५ धावा केल्या आहेत आणि त्यानंतर यशस्वी जैस्वाल १९३ धावांसह तिसरा आहे. असे असताना आज सकाळी सराव सत्रात लोकेश राहुलच्या हाताला दुखापत झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. लोकेश व यशस्वी ही जोडी सलामीला चांगली खेळतेय, परंतु आता लोकेशच्या दुखापतीने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. चौथ्या कसोटीला अद्याप ५ दिवस शिल्लक असले तरी लोकेशची दुखापत गंभीर नसावी अशी प्रार्थना चाहते करत आहेत.
भारताचा संघ - रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, सीन एबॉट, स्कॉट बोलंड, अॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्कस बियू वेबस्टर.