सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडू सरकारने 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी पोंगल सणानिमित्त आपल्या सर्व कर्मचारी, शिक्षक, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक आणि माजी ग्राम प्रशासकीय अधिकारी (VAOs) यांना विशेष बोनस जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या योजनेसाठी एकूण 163.81 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारी कर्मचारी आणि गट क आणि ड च्या शिक्षकांना 3000 रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे.
दैनंदिन वेतनावरील कर्मचारी आणि 2023-2024 आर्थिक वर्षात किमान 240 दिवस सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकत्रित वेतन किंवा विशेष वेळ-स्केल वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1,000 रुपयांचा विशेष बोनस दिला जाईल. निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना यावर्षी पोंगलसाठी 500 रुपयांची भेट दिली जाणार आहे. माजी ग्राम सहाय्यक आणि इतर ग्रामीण प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही हा लाभ मिळणार आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही सरकारने क आणि ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बोनस दिला आहे. 2022-2023 मध्ये, कर्मचाऱ्यांना 30 दिवसांच्या कामाइतके तदर्थ बोनस देण्यात आला, जो कमाल 3,000 रुपयांपर्यंत मर्यादित होता. अर्धवेळ आणि पूर्णवेळ कॅज्युअल कर्मचाऱ्यांना विशेष तदर्थ बोनस म्हणून 1,000 रुपये देण्यात आले.
तामिळनाडू सरकारच्या या घोषणेसोबतच इतर राज्यातबोनस जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, केरळ सरकारने ओणम उत्सवासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना 4,000 रुपये बोनस आणि 2,750 रुपये सण भत्ता दिला होता. त्याच वेळी, तामिळनाडूमधील सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना 8,400 ते 16,800 रुपयांपर्यंत बोनस देण्यात आला होता. पोंगल हा तामिळनाडूचा प्रमुख सण आह तामिळनाडू सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केल्यामुळं कर्चमाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..