ICC Test Ranking: कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा फटका, रोहितसेनेची 'या' स्थानावर घसरण
Team India : भारतीय क्रिकेट संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे पाकिस्तानचा संघही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या सर्व मालिकांमुळे आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. आयसीसीच्या नव्या क्रमवारीत भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडिया क्रमवारीत घसरण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
टीम इंडियाची घसरण
भारतीय संघ दीर्घकाळापासून आयसीसी कसोटी क्रमवारीत वर्चस्व गाजवत होता, मात्र सततच्या पराभवांमुळे टीम इंडियाचे रेटिंग घसरले आहे. टीम इंडिया आता 109 रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर होती. मालिका संपल्यानंतरही टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर राहिली मात्र दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव करताच त्यांचे रेटिंग पॉइंट भारतापेक्षा सरस झाले. यामुळे द. आफ्रिकेचा संघ 112 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. या संघाचे 126 रेटिंग गुण आहेत.
भारत WTC फायनलमधूनही बाहेर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला केवळ क्रमवारीतच फटका बसला नाही तर भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतूनही बाहेर पडला आहे. हा अंतिम सामना 11 जूनपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आलेले नाही. भारत 2021 आणि 2023 मध्ये फायनल खेळला होता. जिथे न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा पराभव केला होता.
टीम इडियाने सलग 2 मालिका गमावल्या
भारतीय कसोटी संघ गेल्या काही काळापासून खराब कामगिरी करत आहे. संघाने मायदेशातील 3 कसोटी सामन्यांची मालिका 0-3 अशी गमावली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दोऱ्यावरील कसोटी मालिका भारताने 1-3 अशी गमावली होती. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता, 4 पैकी 3 सामने जिंकत ऑस्टिरेलियाने ही मालिका खिशात घातली.