Special Flights: महाकुंभासाठी दिल्ली, मुंबईहून विशेष विमानसेवा, जाणून घ्या किती असेल प्रवासभाडे
Times Now Marathi December 22, 2024 09:45 PM

Special Flights: प्रयागराज महाकुंभ 2025 साठी पूर्णपणे तयार आहे. दरम्यान, महाकुंभासाठी विमान कंपन्यांनीही विशेष उड्डाणे सुरू केली आहेत. महाकुंभासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांतून विशेष विमानसेवा जाहीर करण्यात आली आहे. ही उड्डाणे 12 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालतील असे स्पाइसजेटने म्हटले आहे.

प्रयागराजसाठी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि अहमदाबाद येथून विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत अशी माहिती स्पाईसजेट एअरलाइन्सने दिली आहे. या सर्व शहरांमधून दैनंदिन विशेष विमाने धावतील, जी थेट प्रयागराजला जातील. सध्या, स्पाईसजेट ही अहमदाबाद आणि प्रयागराज दरम्यान नॉन-स्टॉप फ्लाइट सेवा देणारी एकमेव विमान कंपनी आहे, ज्यामुळे गुजरातच्या यात्रेकरूंची सोय अधिक सुलभ झाली आहे.



फ्लाइट कसे बुक करालयात्रेकरूंना सर्वोत्तम प्रवास आणि आरामदायी अनुभव देण्यासाठी सर्व फ्लाइट्सची वेळ अतिशय सोयीस्कर ठेवण्यात आली आहे असे स्पाईसजेटने सांगितले. या विशेष फ्लाइट्ससाठी बुकिंग आता स्पाईसजेटच्या अधिकृत वेबसाइट किंवा स्पाइसजेट मोबाइल ॲप आणि ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल आणि एजंट्सद्वारे केले जाऊ शकते.

किती असेल प्रवासभाडे स्पाईसजेटच्या वेबसाइटनुसार, प्रयागराजचे भाडे (Special Flights Ticket) प्रत्येक शहरापेक्षा वेगळे असेल. प्रवासी त्यांची तारीख आणि वेळ निवडून अधिकृत वेबसाइटद्वारे बुकिंग करू शकतात. कोणत्या शहरातून प्रवासभाडे किती असेल ते जाणून घेऊया.



  • दिल्ली ते प्रयागराजचे भाडे 8000 ते 20,000 रुपये आहे.
  • अहमदाबाद ते प्रयागराजचे भाडे 13665 रुपये ते 16000 रुपये आहे.
  • मुंबई ते प्रयागराज दरम्यानचे भाडे 10,313 रुपयांपासून ते सुमारे 13000 रुपयांपर्यंत आहे.
  • बेंगळुरू ते प्रयागराजचे भाडे 9700 ते 16000 रुपयांपर्यंत आहे.

हे भाडे केवळ एकट्या व्यक्तीसाठी एक मार्गी असणार आहे. दुहेरी मार्गासाठी हे भाडे जास्त असेल. शिवाय, जर तुम्ही दिल्लीहून या दरम्यान गेलात तर हे भाडे जास्त असू शकते. स्पाईसजेटने आपल्या वेबसाइटवर प्रवासभाड्याची यादी दिली आहे.

महाकुंभ किती दिवस चालणार?महाकुंभमेळा हा सार्वजनिक श्रद्धेचा जगातील सर्वात मोठा मेळावा आहे, जो तपस्वी, संत, साधू, साध्वी, कल्पवासी आणि जीवनाच्या सर्व स्तरातील यात्रेकरूंना आकर्षित करतो. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रयागराज येथे होणारा महाकुंभ मेळा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो, जो लाखो लोकांसाठी जीवनात एकदाचा आध्यात्मिक अनुभव ठरतो.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.