Reliance Industries latest acquisition: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मोठी डील केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची सहयोगी कंपनी असलेल्या रिलायन्स डिजिटल हेल्थ लिमिटेड (RDHL) ने अमेरिकेतील हेल्थ अलायन्स ग्रुप Health Alliance Group Inc. (HAGI) मधील तब्बल 45 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये झालेला हा करार 10 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 84,95,25,000 रुपयांमध्ये झाला आहे.
HAGI ही अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीची स्थापना गेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी झाली होती. ही कंपनी अमेरिका, भारत आणि जगातील इतर देशांमध्ये गरीबांसाठी टेक्नोलॉजीवर आधारित सोल्युशन्स डिझाईन करते. ही कंपनी हेल्थकेअर, आयटी आणि इनोव्हेशनमध्ये काम करते.
शनिवारी, ऑइल-टू-टेलिकॉम समूहाने सांगितले की त्यांच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी रिलायन्स डिजिटल हेल्थने 20 डिसेंबर 2024 रोजी Health Alliance Group Inc. मधील हिस्सा विकत घेता आहे. कंपनीतील एकूण 45 टक्के इक्विटी स्टेक घेण्यासाठी 10 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके रुपये मोजण्यात आले.
हे पण वाचा :
रिलायन्सने एका रेगुलेटरी फायलिंगमध्ये सांगितले की, या गुंतवणुकीमुळे रिलायन्स डिजिटलला व्हर्च्युअल डायग्नोस्टिक आणि केअर प्लॅटफॉर्म विकसित करण्याची क्षमता मिळेल. यामुळे गरिबांना आरोग्य सेवा मिळणे सोपे होईल. ही गुंतवणूक एक रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन नाहीये आणि कंपनीचे प्रमोटर्स, प्रमोटर ग्रुप आणि ग्रुप कंपन्यांचा यात कोणताही इटरेस्ट नाहीये. हा व्यवहार दोन आठवड्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी कोणत्याही सरकारी किंवा नियामक परवानगीची आवश्यकता नाही.